गुहागर, ता. 04 : भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय व उज्ज्वल शिक्षण मंडळ, रत्नागिरी तसेच आगाम – द कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट यांच्यात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कौशल्यविकास आणि करिअरविषयक मार्गदर्शनासाठी ३ सप्टेंबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला. Memorandum of Understanding
या करारांतर्गत कला, डिझाइन, ग्राफिक डिझाइन, ॲनिमेशन, यूआय/यूएक्स, फोटोग्राफी, जाहिरात आणि डिजिटल मीडिया या क्षेत्रांतील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच डिझाइन थिंकिंग, इनोव्हेशन, पोर्टफोलिओ निर्मिती, पोस्टर-लोगो-स्केचिंग स्पर्धा, तज्ज्ञांची व्याख्याने, कला प्रदर्शन, उद्योग व स्टुडिओ भेटी तसेच इंटर्नशिप मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. Memorandum of Understanding
या करारावर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील तसेच उज्ज्वल शिक्षण मंडळ व आगामचे अध्यक्ष श्री. संदेश पालये, यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी भारत शिक्षण मंडळाचे विश्वस्त श्री. विनायक हातखंबकर, आगाम अप्लाईड आर्ट च्या सहा. प्रा. प्रतीक्षा पांचाळ, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. वसुंधरा जाधव, आयक्यूएसी समन्वयक प्रा. विनय बावदाने आणि विज्ञान विभागप्रमुख प्रा. विनय कलमकर उपस्थित होते. या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना सर्जनशील क्षेत्रातील नव्या संधींची ओळख होऊन त्यांच्या कौशल्यविकासाला आणि करिअरला नवी दिशा मिळणार आहे. Memorandum of Understanding
