• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 September 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’द्वारे खरीप पीक नोंदणी मोहीम

by Guhagar News
September 1, 2026
in Ratnagiri
19 0
0
Kharif Crop Registration Campaign
38
SHARES
108
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

१० नोव्हेंबरपर्यंत १०० टक्के नोंदणीचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

रत्नागिरी, ता. 01 : जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम २०२६-२०२७ साठी केंद्र शासनाच्या ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ (DCS MH) मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणीची मोहीम सुरू झाली असून, १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत १०० टक्के पीक नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने सर्व शेतकरी खातेदारांना केले आहे. ही कार्यवाही ११ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. Kharif Crop Registration Campaign

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गट क्रमांक व सर्व्हे क्रमांकनिहाय प्रत्यक्ष शेतातील पिकांची अचूक माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केली जात आहे. यासाठी गावनिहाय सहायकांची नेमणूक करण्यात आली असून, नोंदणीकृत सहायकांमार्फत ही सर्व नोंदणी विनामूल्य (कोणतेही शुल्क न घेता) केली जात आहे. Kharif Crop Registration Campaign

नोंदणीचे फायदे

डिजिटल पीक नोंदणीद्वारे अद्ययावत होणाऱ्या या माहितीचा थेट फायदा शेतकऱ्यांना विविध शासकीय कामांसाठी होणार आहे.
विविध शासकीय कृषी योजनांचा थेट लाभ मिळवण्यासाठी
पीकविमा भरपाई व आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नुकसान भरपाईसाठी
कृषी सांख्यिकी आणि केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘ॲग्रीस्टॅक’ प्रकल्पासाठी

शेतकऱ्यांना आवाहन

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही मोहीम वेळेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व तहसीलदार, कृषी विभाग तसेच क्षेत्रीय यंत्रणांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. शेतकरी खातेदारांनी आपल्या शेतजमिनीतील क्षेत्राची १०० टक्के पीक नोंदणी पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित सहायकांकडून करून घ्यावी. नोंदणी प्रक्रियेत काही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी गावाचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) किंवा कृषी सहायकांशी तात्काळ संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. Kharif Crop Registration Campaign

Tags: GuhagarGuhagar NewsKharif Crop Registration CampaignLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet10
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.