१०४.३६ टक्के मनुष्य दिन निर्मिती, ग्रामपंचायत स्तरावर गुहागरचे प्रभावी काम
गुहागर, ता. 01 : ‘विकसित भारत-रोजगार व आजीविका अभियान (ग्रामीण)’ अंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली. २०२६-२७ या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत जिल्ह्यासाठी ठरवून दिलेल्या एकूण मनुष्य दिन निर्मितीच्या उद्दिष्टाच्या तब्बल १०४.३६ टक्के काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायत यंत्रणेने या कालावधीत दिलेल्या उद्दिष्टाच्या तब्बल १४७.२ टक्के कामगिरी करत ग्रामीण भागात रोजगाराची मोठी पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. Strong performance of MNREGA in the district
यामध्ये लांजा आणि दापोली तालुके अग्रस्थानी आहेत. जिल्हा परिषदेच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत जिल्ह्यासाठी एकूण २ लाख २० हजार २९८ मनुष्यदिनांचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले होते. त्या तुलनेत जिल्ह्यात तब्बल २ लाख २९ हजार ९२१ मनुष्यदिनांची साध्यता (१०४.३६ टक्के) झाली आहे. तालुकानिहाय कामगिरीचा विचार करता लांजा तालुक्याने उद्दिष्टाच्या ११९.९२ टक्के, दापोली तालुक्याने १३२.१५ टक्के काम करत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. Strong performance of MNREGA in the district
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत राबवण्यात येणाऱ्या ५० टक्के प्रमाणातील कामांमध्ये अधिक गती दिसून आली. या विभागासाठी एप्रिल ते ऑगस्ट २०२६ पर्यंत १ लाख १० हजार १४९ मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ग्रामपंचायतींनी १ लाख ६९ हजार ८३८ मनुष्यदिनांचे काम पूर्ण करत १४७.२ टक्के यश संपादन केले आहे. Strong performance of MNREGA in the district
ग्रामपंचायत स्तरावर लांजा (२३५.७टक्के), दापोली (१९१.५ टक्के) आणि गुहागर (१८४.१ टक्के) या तालुक्यांनी अतिशय प्रभावी काम केले असून, ग्रामीण भागातील मजुरांना स्थानिक पातळीवरच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीण भागातील विकासकामे गतीने पूर्ण करण्यासोबतच मजुरांच्या हाताला वेळेवर काम देण्यावर जिल्हा परिषदेचा भर असून, आगामी काळातही ही गती कायम ठेवली जाईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. Strong performance of MNREGA in the district