• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 September 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुक्यातील अवैद्य धंदे बंद करावेत

by Mayuresh Patnakar
September 1, 2026
in Guhagar
28 0
0
Statement to Guhagar police regarding illegal business
55
SHARES
157
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भाजपा जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे यांचे गुहागर पोलिसांना निवेदन

गुहागर, ता. 01 : आमदार भास्कर जाधव यांच्या म्हणण्यानुसार, गुहागर तालुक्यात चालू असणारे आकड्याचे, मटक्याचे, जुगाराचे व दारूचे अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन भाजपा जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी गुहागर पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूण यांना दिले आहे.  Statement to Guhagar police regarding illegal business

या पत्रात म्हटले आहे की, नुकताच गुहागर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये फिरत आहे. या व्हिडिओमध्ये गुहागर तालुक्यामध्ये विशेष करून शृंगारतळी या विकसित बाजारपेठेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे मटक्याचे, आकड्याचे, जुगाराचे व दारूचे धंदे आहेत असे त्यांनी जाहीरपणे व्यक्त केले आहे. भास्कर जाधव यांनी केलेल्या या वक्तव्याचा मी भाजपाचा जिल्हा सरचिटणीस म्हणून निषेध व्यक्त करत आहे. त्यामुळे शृंगारतळी बाजारपेठेतच नव्हे तर संपूर्ण गुहागर तालुक्यात आमदारांच्या म्हणण्याप्रमाणे चालू असणाऱ्या मटका, आकडा, जुगार व दारू धंद्यावरती तातडीने कारवाई करून या अवैद्य धंद्याचा समूळ नायनाट करावा. आपण या सर्व धंद्यावर केलेली कारवाई प्रतिदिनी नाव गावांसह जाहीर करावी. यामुळे व्यसनाधीनतेची तरुणाईला लागलेली कीड, लोकांचे उध्वस्त होणारे कुटुंब यावरती आळा बसणार आहे, असे या निवेदनात नमूद केले आहे. Statement to Guhagar police regarding illegal business

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarStatement to Guhagar police regarding illegal businessटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share22SendTweet14
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.