• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 August 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणेशोत्सवानिमित्त ‘स्वराज्य बाजारपेठ’ सुरू

by Mayuresh Patnakar
August 31, 2026
in Maharashtra
19 0
0
‘Swarajya Market’ Launched
38
SHARES
108
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विधान परिषदेचे उपसभापती सचिन भाऊ अहिर यांच्या हस्ते भव्य उद्घाटन

गुहागर, ता. 31 : गणेशोत्सवाच्या निमित्ताने मराठी उद्योजकांना प्रत्यक्ष बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘स्वराज्य मराठी बाजारपेठेचे’ भव्य उद्घाटन विधान परिषदेचे उपसभापती सचिन भाऊ अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. ‘Swarajya Market’ Launched

यावेळी मनोगत व्यक्त करताना सचिन भाऊ अहिर म्हणाले, “हा कार्यक्रम आकाराने छोटा असला तरी यामागची संकल्पना खूप मोठी आहे. या बाजारपेठेत सुमारे १०० मराठी उद्योजक, विशेषतः महिला उद्योजक सहभागी झाले आहेत. भविष्यात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अशा मराठी उद्योजकांच्या बाजारपेठा उभ्या राहायला हव्यात. यासाठी सरकार म्हणून आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल.” यावेळी त्यांनी यंदाचा ग्लोबल कोकण महोत्सव मुंबईतील गिरणगावात, जांभोरी मैदानावर आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही केली. ‘Swarajya Market’ Launched

‘Swarajya Market’ Launched

स्वराज्य बाजारपेठ आणि कोकणी बाजार या उपक्रमांच्या माध्यमातून आजवर सुमारे १,००० मराठी उद्योजकांना एकत्र आणण्याचे काम झाले आहे. मराठी तरुण तसेच कष्टाळू महिला मोठ्या संख्येने छोटे-छोटे उद्योग उभारत आहेत. या उद्योजकांची संख्या आणखी वाढविण्यासाठी आणि पुढील पाच वर्षांत किमान एक लाख उद्योजकांसाठी प्रत्यक्ष मार्केटिंगच्या व्यवस्था उभ्या करण्याचे मोठे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी मराठी सामाजिक कार्यकर्ते, संस्था आणि समाजातील विविध घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. ‘Swarajya Market’ Launched

मुंबईतील मराठी बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोअर परळ, गिरणगाव परिसरात ही बाजारपेठ सुरू असून गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ६ सप्टेंबरपर्यंत ही बाजारपेठ सुरू राहणार आहे. ‘Swarajya Market’ Launched

मराठी उद्योजकांकडूनच गणेशोत्सवाची खरेदी करा

गणेशोत्सवानिमित्त सर्व गणेशभक्त आणि मराठीप्रेमी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, यंदाच्या गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेली खरेदी मराठी उद्योजकांकडूनच करा. मराठी उत्पादकांनी तयार केलेली दर्जेदार उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘स्वराज्य मराठी बाजारपेठ’ हे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. या बाजारपेठेत गणपतीच्या मखरांपासून पूजेचे साहित्य, मिठाई, कपडे, साड्या, ज्वेलरी, घरगुती वस्तू आणि विविध प्रकारची दर्जेदार उत्पादने उपलब्ध आहेत. विशेषतः कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी कोकणात जाण्यापूर्वी आवश्यक खरेदी मराठी उद्योजकांकडून करावी, असे आवाहन करण्यात आले. ‘Swarajya Market’ Launched

‘Swarajya Market’ Launched

या उपक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. शिवसेना सचिव व चित्रपट सेनेचे प्रमुख सुशांत शेलार यांनीही या बाजारपेठेसाठी विशेष पुढाकार घेतला आहे. उद्घाटनासाठी सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजन गावंड, राज ठाकूर, पर्यावरणस्नेही गणपतीची मखरे केवळ भारतातच नव्हे तर जगभर पोहोचविणारे नाना शेंडेकर, शिक्षण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते निरंजन अहिर, ग्लोबल कोकणच्या राजश्री यादवराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘Swarajya Market’ Launched

ग्लोबल कोकणचे संजय यादवराव आणि कोकणी बाजारपेठेचे अजय यादव यांनी या बाजारपेठेसाठी पुढाकार घेतला आहे. ग्लोबल कोकण आणि कोकणी बाजारपेठेच्या माध्यमातून हजारो मराठी उद्योजकांना संघटित करून त्यांची दर्जेदार उत्पादने प्रथम मुंबईच्या बाजारपेठेत आणि त्यानंतर देश-विदेशात पोहोचविण्यासाठी शिवस्वराज्य मराठी संघटनेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण चळवळ उभारण्यात येत आहे. ‘Swarajya Market’ Launched

‘स्वराज्य मराठी बाजारपेठ’ ही याच व्यापक चळवळीचा एक महत्त्वाचा भाग आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अशा स्वरूपाच्या अनेक मराठी बाजारपेठा उभारण्याचा संकल्प शिवस्वराज्यने केला आहे.

‘मराठी उत्पादन’ हीच आपली ओळख

दर्जेदार उत्पादने निर्माण करणारा मराठी उत्पादक आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करणारा मराठी उद्योजक ही महाराष्ट्राची मोठी ताकद आहे. ‘दर्जा, प्रामाणिकपणा आणि विश्वास’* ही मराठी उद्योजकांची ओळख अधिक मजबूत झाली पाहिजे. अशा मराठी उद्योजकांकडून खरेदी करण्याला ग्राहकांनी प्राधान्य दिल्यास त्याचा थेट फायदा आपल्या मराठी तरुणांच्या आणि महिलांच्या उद्योगांना होईल. ‘Swarajya Market’ Launched

या बाजारपेठेला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा मराठी उद्योजकांच्या सामूहिक शक्तीचा सकारात्मक संकेत आहे. हा उपक्रम दरवर्षी अधिक मोठ्या स्वरूपात राबविण्याचा शिवस्वराज्यचा संकल्प आहे. ‘Swarajya Market’ Launched

Tags: ‘Swarajya Market’ LaunchedGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.