• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 August 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणेशोत्सवासाठी चिपळूण आगाराच्या १४५ बसेस फुल्ल!

by Mayuresh Patnakar
August 29, 2026
in Ratnagiri
46 0
0
Buses from Chiplun depot full for Ganeshotsav
90
SHARES
258
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोकणवासियांचा सामूहिक आरक्षणाला प्राधान्य; बसेसची संख्या आणखी वाढणार

चिपळूण, ता. 29 : गणेशोत्सवासाठी गावच्या दिशेने येणाऱ्या कोकणवासीयांची संख्या लक्षात घेता चिपळूण आगाराच्या वतीने जादा बसेसचे नियोजन केले आहे. त्यानुसार आतापर्यंत तब्बल १४५ बसेस या पूर्णतः फुल्ल झाल्या आहेत. कोकणवासियांनी जादा बसेसप्रमाणे ग्रुप बुकिंगलाही प्राधान्य दिले आहेत. जादा बसेसची संख्या आणखी वाढणार असून त्यासाठी आगारप्रशासन प्रयत्नशील आहे. Buses from Chiplun depot full for Ganeshotsav

गणेशोत्सव आणि कोकणवासीय यांचे अनोखे नाते असल्याने मुंबई, पुण्यातील कोकणवासीय गावच्या दिशेने दाखल होतात. लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर मनोभावे पूजा-आरत्या व त्यानंतर विसर्जन होताच दाखल झालेले कोकणवासीय पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतात. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी चिपळूण आगाराच्या वतीने विशेष जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाची चाहूल लागताच चिपळूण आगाराच्या वतीने जादा एसटी बसेसच्या नियोजनाबाबत प्रशासनाची स्वतंत्र बैठक काही दिवसापूर्वी पार पडली.  Buses from Chiplun depot full for Ganeshotsav

गावच्या दिशेने येणाऱ्या कोकणवासीयासाठी पहिल्या टप्प्यात ५० तर दुसऱ्या टप्प्यातील ५० अशा जवळपास १०० जादा बसेस आगाऊ बुकिंगसाठी नियोजित करण्यात आल्या होत्या. काही दिवसातच या सर्व बसेस पूर्ण झाल्या. प्रवाशांचा बस आरक्षणासाठी वाढता ओघ लक्षात घेता आतापर्यंत गणेशोत्सवासाठी जवळपास १४५ जादा बसेस पूर्णतः फुल्ल झाल्या आहेत. उपलब्धतेनुसार आगार प्रशासन आणखी जादा बसेस आगाऊ बुकिंगसाठी नियोजित करणार आहे. Buses from Chiplun depot full for Ganeshotsav

विशेष म्हणजे जादा बसेसप्रमाणे कोकणवासीयांनी ग्रुप बुकिंगला प्राध्यान्य दिले आहे. त्यानुसार जवळपास १६ बसेस या ग्रुप बुकिंगसाठी नियोजित झाल्या आहेत. यामुळेच गावागावातून कोकणवासीयाचा एकत्रित प्रवास होणार आहे. परतीच्या प्रवासावेळी कोकणवासीय प्रवाशांची गैरसोय होवू नये यावरही चिपळूण आगाराकडून विशेष भर देण्यात येणार आहे. यासाठी परतीच्या वाहतुकीच्या नियोजनाबाबतची बैठकही पार पडणार आहे. दरम्यान, ग्रुपला कोकवासीयांनी अधिकाधिक प्राध्यान्य द्यावे, असे आगार प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. Buses from Chiplun depot full for Ganeshotsav

Tags: Buses from Chiplun depot full for GaneshotsavGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share36SendTweet23
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.