• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 August 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिखली येथे सीपीएचसी प्रशिक्षण

by Ganesh Dhanawade
August 17, 2026
in Guhagar
55 0
0
CPHC Training at Chikhli
107
SHARES
307
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आरोग्य मंदिर चिखली अंतर्गत सीपीएचसी प्रशिक्षण

गुहागर, ता. 17 :  रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभाग प्रशिक्षण केंद्रच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक, आशा ताई यांच्यासाठी सीपीएचसी प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य वर्धिनी केंद्र या ठिकाणी देण्यात येणाऱ्या 13 सेवांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले. यावेळी डॉ. शरण पाठोळे, डॉ . लिंगायत, श्रीम. शिरगांवकर, श्रीम. झोरे यांनी प्रशिक्षण दिले. CPHC Training at Chikhli

या प्रशिक्षणाचा चिखली आरोग्य मंदिर येथील 63 कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. या प्रशिक्षणात गरोदर माता प्रसूती दरम्यान व पश्चात देण्यात येणाऱ्या सेवा, बालकांना देण्यात येणाऱ्या सेवा लसीकरण, कुटुंब कल्याण कार्यक्रम, सांसर्गिक असंसर्गिक आजार, कान नाक घसा काळजी, क्षयरोग, कुष्ठ रोग, मलेरिया, पाणी शुद्धीकरण बाबत माहीती, मौखिक आरोग्य, मोफत औषधोपचार, प्रयोगशाळा तपासणी, बाह्यरुग्ण ओपीडी, रेफरल सेवा, आरोग्य विषयक मार्गदर्शन अशा 13 सेवांची माहिती देण्यात आली. CPHC Training at Chikhli

विशेष बाब म्हणजे हे प्रशिक्षण भारतीय बैठक म्हणजे जमिनीवर सतरंजी घालू त्यावर सर्व अधिकारी, कर्मचारी एकत्र खाली बसून देण्यात आले. या प्रशिक्षणाला जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांनी भेट दिली. या प्रशिक्षणवेळी  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडे, प्रा. आ. केंद्र चिखलीचे डॉ. इंगळे, विस्तार अधिकारी श्री. इरकर, आरोग्य सहाय्यक श्री. जाधव,  चिखली प्रा. आ. केंद्राचे आरोग्य सहाय्यक श्री. सागर मोरे, श्री भालेराव आदी उपस्थित होते. CPHC Training at Chikhli

Tags: CPHC Training at ChikhliGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share43SendTweet27
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.