• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 August 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भारताच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलूया

by Mayuresh Patnakar
August 17, 2026
in Guhagar
34 1
0
Independence Day at Gogate Joglekar College
67
SHARES
192
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रा. डॉ. मकरंद साखळकर; गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळा

रत्नागिरी, ता. 17 : विकसित भारत घडवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांची भूमिका व योगदान अत्यंत मोलाचे आहे. आपले काम जर आपण सर्वोच्च पातळीवर, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केले, तरच विकसित भारताचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकते. आपल्या वाट्याला आलेल्या सर्व जबाबदाऱ्या आपण उत्तम प्रकारे पार पाडल्या पाहिजेत, तरच हे शक्य होईल, असे प्रतिपादन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले. Independence Day at Gogate Joglekar College

जवाहर क्रीडांगणावर स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट्स, एनएसएस स्वयंसेवक, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. Independence Day at Gogate Joglekar College

Independence Day at Gogate Joglekar College

प्राचार्य डॉ. साखळकर म्हणाले की, स्वातंत्र्यदिन आणि आपले कर्तव्य विसरता कामा नये. स्वातंत्र्यदिन साजरा करताना हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक सैनिकांनी केलेला त्याग, संघर्ष आणि बलिदान विसरता कामा नये. या सर्व ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्यवीरांना आपण मनःपूर्वक कृतज्ञतापूर्वक अभिवादन करूया. आज आपल्याला “देश प्रथम” ही भावना आणि “समाजहित प्रथम” ही मूल्ये अंगीकारण्याची गरज आहे. मुख्य इमारतीत गणित विभाग, आय.टी. आणि महिला विकास कक्षाचे भित्तिपत्रकाच्या अनावरण करण्यात आले. अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय एनएसएस युनिटच्या मशाल या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला. Independence Day at Gogate Joglekar College

राधाबाई शेट्ये सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मंचावर प्राचार्य डॉ. साखळकर, कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, संस्थेच्या आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. सुप्रिया टोळ्ये यांनी केले. सौ. विस्मया कुलकर्णी यांनी आभार मानले. Independence Day at Gogate Joglekar College

Tags: GuhagarGuhagar NewsIndependence Day at Gogate Joglekar CollegeLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share27SendTweet17
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.