• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 August 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पन्नाशीतही मैत्रीचा सुगंध… आठवणींनी पुन्हा फुलला शाळेचा कट्टा

by Mayuresh Patnakar
August 11, 2026
in Guhagar
69 1
0
Class 10 Batch Reunion at Pedhambe
137
SHARES
390
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या १९९१-९२ दहावीच्या बॅचचे पेढांबे येथे स्नेहसंमेलन

गुहागर, ता. 11 : वयाची पन्नाशी ओलांडली, आयुष्याची वाटचाल अर्धशतकापार गेली, संसाराच्या जबाबदाऱ्या वाढल्या… तरी शाळेच्या बाकावर जुळलेली मैत्री मात्र आजही तितकीच टवटवीत आहे. याच मैत्रीच्या नात्याला पुन्हा एकदा उजाळा देत श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर येथील १९९१-९२ सालच्या दहावीच्या बॅचचे पाचवे स्नेहसंमेलन पेढांबे येथे उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडले. या स्नेहमेळाव्यास ५० हून अधिक मित्र-मैत्रिणी आवर्जून उपस्थित होते. Class 10 Batch Reunion at Pedhambe

आयुष्याच्या उतरंडीवरील प्रवास आता सुरू झाला आहे, याची जाणीव असतानाच ‘आरोग्य जपा, आनंदाने जगा आणि मैत्रीचे हे नाते असेच जपून ठेवा’, असा संदेश या स्नेहसंमेलनातून सर्वांनी दिला.

Class 10 Batch Reunion at Pedhambe

३५ वर्षांनंतर पुन्हा जाग्या झाल्या शाळेच्या आठवणी

रविवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच पेढांबे येथील स्नेहसंमेलन स्थळी मित्र-मैत्रिणींचे आगमन सुरू झाले. एकमेकांना पाहताच चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि भेटीचा आनंद यामुळे तब्बल ३५ वर्षांपूर्वीच्या शाळेच्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. शाळेतील खोड्या, गमतीदार किस्से, वर्गातील धमाल, मित्र-मैत्रिणींसोबत घालवलेले अविस्मरणीय क्षण यांना उजाळा देत प्रत्येक जण पुन्हा एकदा जणू त्या शाळेच्या दिवसांतच रमला. पेढांबे येथील वॉटर पार्कमध्ये तब्बल दोन तास पाण्यात मनसोक्त खेळण्याचा आनंद सर्वांनी लुटला. त्यानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घेत मित्रमैत्रिणींनी जुन्या आठवणींची मैफल रंगवली. Class 10 Batch Reunion at Pedhambe

Class 10 Batch Reunion at Pedhambe

 ‘संवाद १९९२’ने पुन्हा जोडली मैत्रीची नाळ

या स्नेहसंमेलनाच्या आयोजनासाठी माधवी विचारे, सुरेंद्र मर्दा, रवींद्र घडवले आणि अनिल भुवड यांनी विशेष मेहनत घेतली. ‘संवाद १९९२’ या ग्रुपच्या माध्यमातून संमेलनाची माहिती सर्व मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचवण्यात आली. मुंबई आणि परिसरात व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क साधण्याची जबाबदारी अनिल भुवड यांनी रचनात्मक पद्धतीने पार पाडली. तर संजय पवार, सुरेंद्र मर्दा आणि माधवी विचारे यांनी गुहागर व परिसरातील मित्र-मैत्रिणींशी संपर्क साधून त्यांना या स्नेहमेळाव्यात सहभागी करून घेतले. उमेश देवरुखकर यांनी स्नेहसंमेलनासाठी पेढांबे येथील वॉटर पार्कचे ठिकाण निश्चित केले. Class 10 Batch Reunion at Pedhambe

Class 10 Batch Reunion at Pedhambe

पन्नाशीतही तरुणाईचा उत्साह!

दुपारच्या सत्रात सर्व मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र जमले. सुरेंद्र मर्दा आणि त्यांच्या टीमने विविध फनी गेम्सचे आयोजन केले होते. पन्नाशीच्या उंबरठ्यावर पोहोचले असले तरी प्रत्येकाच्या मनातील तरुणाई मात्र अजूनही तितकीच जिवंत असल्याचे या खेळांमधून दिसून आले. हसत-खेळत, एकमेकांची फिरकी घेत आणि जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी या खेळांचा मनमुराद आनंद लुटला. काही क्षणांसाठी वय, जबाबदाऱ्या आणि दैनंदिन जीवनातील धावपळ विसरून सर्वजण पुन्हा शाळकरी झाले होते. Class 10 Batch Reunion at Pedhambe

Class 10 Batch Reunion at Pedhambe

 ‘आयुष्य जपा, आनंदाने जगा’चा भावनिक संदेश

यानंतर अनेक मित्र-मैत्रिणींनी आपले मनोगत व्यक्त केले. आयुष्याच्या उतरंडीवरील प्रवासाला आता सुरुवात झाली असून, या प्रवासात काही जिवलग मित्र आपल्याला कायमचे सोडून गेले आहेत, ही जाणीव अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. या स्नेहसंमेलनात दिवंगत मित्र-मैत्रिणींच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मंगेश दाते आणि ज्योती मुरकर यांनी मनोगत व्यक्त करताना ‘आयुष्य जपा, औषधे वेळेवर घ्या आणि उर्वरित आयुष्य आनंदाने जगा’, असा मोलाचा सल्ला दिला. मंदार आठवले आणि सुरेंद्र मर्दा यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारे भेटण्याचा निर्धार व्यक्त करताना, “पुन्हा भेटूच… पण पुढच्या वेळी यापेक्षाही मोठ्या संख्येने भेटूया,” असे आवाहन सर्वांना केले. Class 10 Batch Reunion at Pedhambe

गीत-संगीताने रंगली मैत्रीची मैफल

स्नेहसंमेलनात गीत-संगीताचीही मैफल रंगली. सुरेंद्र केतकर यांनी विविध गाणी सादर करून वातावरण प्रफुल्लित केले. मनीषा गुहागरकर यांनीही आपल्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली, तर राष्ट्रभक्तीच्या भावनेने ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

३५ वर्षांपूर्वी शाळेच्या वर्गात सुरू झालेली मैत्रीची कहाणी आज पन्नाशी ओलांडूनही तितकीच जिवंत आहे. काळाच्या ओघात प्रत्येकाच्या आयुष्याला वेगवेगळ्या वाटा मिळाल्या, अनेक जबाबदाऱ्या आल्या; मात्र मैत्रीच्या नात्याला काळाची मर्यादा नसते.  पन्नाशी आली, केस पांढरे झाले, आयुष्याने अनेक चढ-उतार दाखवले… पण मित्र भेटले की मन मात्र आजही त्या शाळकरी वयातच जाऊन थांबते—यालाच तर खरी मैत्री म्हणायची! हेच या स्नेहसंमेलनाने पुन्हा एकदा सिद्ध केले.

यावेळी मंदार आठवले, रामकृष्ण पारदळे, ज्योती भागवत,  ज्योती मुरकर, सुनिल मर्चंडे,  सुनिल देवरुखकर, कमळ घडवले (दादर- मुंबई),  रविंद्र घडवले, सुहास कदम, सुरेंद्र केतकर, सिंकदर माहीमकर, रमेश मोरे, शैलैश कनगुटकर, समिर घाणेकर, सुधीर कदम, नितीन बेंडल, सुरेंद्र मर्दा, संगिता दणदणे, दिपक मुके, ज्योत्स्ना बागकर, सचिन चौधरी, रमेश निंबरे, संतोष निवाते, यशवंत घाणेकर, आनंद लिंगायत, अनिल भुवड, दिनेश साटले, पुजा दाभोळकर, सत्यवान घाडे, संदीप रहाटे, अविनाश वैद्य, रविंद्र बागकर, प्रणाली बेंडल, शर्मिला भोजने, मंगेश दाते, बापु कनगुटकर, संजय पवार, निलेश गोयथळे, मनिषा गुहागरकर, दिपक काजारे, अभिजीत भोसले, मुकेश जांगळी, आशिष विचारे, प्रभाकर वेद्रे, उद्देश तांडेल, विलास नरलकर, सुनिता शिंदे (कांजुरमार्ग – मुंबई), अशोक सांगळे, सुधाकर घडवले, सुषमा पालेकर, मुकुंद गोणबरे, राकेश गोयथले, माधुरी जोशी, अजय जोशी, विनोद सांगळे, दिपाली गुरव (मुंबई), उदय असगोलकर, तुलसिदास सहदेव वाडकर, सदानंद हरी निंबरे, मनोज तोडणकर, रमेश गणपत भुवड, सोनाली खातु, विलास नरळकर, मयुरेश पाटणकर, बाबु गुहागरकर, सुरेंद्र केतकर उपस्थित होते. Class 10 Batch Reunion at Pedhambe

Tags: Class 10 Batch Reunion at PedhambeGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi Newsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share55SendTweet34
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.