• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 August 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी

by Manoj Bavdhankar
August 7, 2026
in Maharashtra
29 0
0
57
SHARES
162
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी १६ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी, ता. 07 : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १० वी, १२ वी, आयटीआय, पदविका (डिप्लोमा) तसेच पदवीधर (बी.ई., बी.टेक. सह) युवकांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेत सहभागासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ ऑगस्टपर्यंत असून, जास्तीत जास्त पात्र युवकांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त द. दी. चव्हाण यांनी केले आहे. Golden internship opportunity for youth

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने’चा तिसरा टप्पा आता सुरू झाला आहे. याअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि बजाज जनरल इन्शुरन्स (Bajaj General Insurance) यांसारख्या विविध नामांकित आस्थापनांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. Golden internship opportunity for youth

योजनेचे स्वरूप आणि फायदे:

 पात्रता: १८ ते २५ वयोगटातील भारतीय युवक या योजनेसाठी पात्र आहेत. (अट: उमेदवार सध्या पूर्णवेळ शिक्षण घेत नसावा, इतर कोणत्याही कौशल्य प्रशिक्षणात नसावा किंवा नोकरीत नसावा.)
 कालावधी व विद्यावेतन: निवड झालेल्या उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. या कालावधीत त्यांना दरमहा ९,००० रुपये विद्यावेतन (Stipend) दिले जाणार आहे.
 विमा संरक्षण: प्रशिक्षणार्थ्यांना ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ आणि ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने’चे संरक्षणही मोफत दिले जाईल. Golden internship opportunity for youth

सहभागासाठी इच्छुक उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. तेथे ‘रजिस्टर / लॉगिन’ (Register / Login) या टॅबवर क्लिक करून आपली नोंदणी मुदतीच्या आत पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी व समन्वयासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचे जिल्हा समन्वयक नितीश मुरकर (मो. ७९७२९१४८४६) आणि पांडुरंग कानडे (मो. ८४२१२४१३३१) यांच्याशी थेट संपर्क साधता येईल. Golden internship opportunity for youth

उद्योजक व आस्थापनांसाठी विशेष आवाहन:

ज्या उद्योजकांना किंवा कंपन्यांना प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत उमेदवारांची भरती करावयाची आहे, अशा उद्योजकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आवार (ITI Campus), नाचणे रोड, पोस्ट एमआयडीसी, रत्नागिरी या कार्यालयाशी संपर्क साधावा. Golden internship opportunity for youth

Tags: Golden internship opportunity for youthGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share23SendTweet14
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.