महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा
रत्नागिरी, ता. 03 : जिल्ह्यातील प्रलंबित महसुली प्रकरणे वेळेत मार्गी लावा. तसेच कलम १५५, ७० ब आणि ८५ अंतर्गत झालेल्या चुका तातडीने दुरुस्त करा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई अटळ राहील, असा कडक इशारा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध महसुली प्रश्नांचा सविस्तर आढावा घेत अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण आदेश दिले. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, आमदार प्रसाद लाड यांच्यासह महसूल आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. Chandrashekhar Bawankule’s district tour
सात दिवसांत प्रकरणे निकाली काढा
महसूल मंत्री बावनकुळे यांनी, कलम १५५ नुसार एकूण ४६२८ प्रकरणे असून, तपासण्यात आलेल्या १२३५ प्रकरणांपैकी ५३ प्रकरणे दोषी आढळली आहेत. यातील चुका तातडीने दुरुस्त कराव्या आणि कलम १५५ ची प्रकरणे सात दिवसांच्या आत निकाली काढावीत. तसेच अकृषक (NA) परवानगीची १०३६ प्रकरणे प्राप्त असून त्यातील १५० वर सुनावणी सुरू आहे, ती गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ‘वर्ग २’ मधून ‘वर्ग १’ मध्ये जमिनी करण्यासाठी १५ हजार पैकी केवळ १० जमिनींचीच प्रक्रिया पूर्ण झाल्याने याबाबत गती वाढवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच २१ हजार ४२३ ‘जिवंत सातबारा’ प्रकरणांचाही आढावा घेण्यात आला. Chandrashekhar Bawankule’s district tour
देवस्थानच्या जमिनी परत घ्या !
जिल्ह्यात देवस्थानच्या २३६ जमिनी आहेत. जर यापैकी काही जमिनी चुकून वक्फ बोर्डाच्या नावाने लागल्या असतील, तर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी घेऊन त्या जमिनी पुन्हा देवस्थानकडे जमा कराव्यात, असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्र्यांनी दिले. तसेच, केवळ नोटीस देऊन जमा केलेल्या वनजमिनी नियमानुसार शेतकऱ्यांना तातडीने परत द्याव्यात. शासनाने भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींपैकी ४५ प्रकरणांत शर्तभंग झाला असून, या सर्व जमिनी ‘वर्ग २’ करण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले. Chandrashekhar Bawankule’s district tour
शेत पाणंद रस्त्यांसाठी २०२७ ची डेडलाईन
‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजने’अंतर्गत जिल्ह्यात एकूण ४५१३ रस्ते निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात १९४ रस्त्यांची कामे नियोजित असून २०० किलोमीटरचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १ जानेवारी २०२७ पर्यंत सर्व रस्ते शोधणे, त्यांचे सीमांकन करणे आणि त्यांना सांकेतांक क्रमांक देण्याचे काम पूर्ण करावे, असे निर्देश दिले. तसेच, शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे (केंद्र, राज्य आणि इनाम/वतन जमिनी) नियमानुकूल करण्यासाठी १५ ऑगस्टच्या ग्रामसभांमधून व नगरपालिकांकडून माहिती गोळा करून ३१ ऑक्टोबरपर्यंत अंतिम यादी निश्चित करावी, असेही ते म्हणाले. Chandrashekhar Bawankule’s district tour
समुद्रकिनाऱ्यावरील घरे नियमित करणार
जिल्ह्यातील एकही व्यक्ती घराविना राहू नये, यासाठी समुद्रकिनाऱ्यावरील घरे सर्वेक्षण करून नियमित केली जातील. तुकडेबंदी संदर्भात ७५० केसेस प्रलंबित असून याबाबत ३१ मार्च २०२७ पर्यंत रेखांकन करण्याचे नियोजन प्रशासनाने करावे. Chandrashekhar Bawankule’s district tour
खेडमधील जमीन शासनजमा करण्याचे आदेश
कलम २२० मधील सुधारणांच्या अंमलबजावणीकडे लक्ष वेधत, खेडमधील क्लस्टर १ सुरू न झाल्याने वाडी बेलदार (ता. खेड) येथील तब्बल ६५.४५ हेक्टर जमीन तत्काळ शासनजमा करण्याचे आदेश देण्यात आले. यासोबतच जिल्ह्यातील गौण खनिजाच्या सर्व २२ गटांचा लिलाव झालाच पाहिजे, यासाठी आवश्यक धोरण तयार करून शासनाकडे पाठवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (७० ब) मधील ११७५ प्रकरणांत अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक कार्यवाही करावी, असेही त्यांनी नमूद केले. Chandrashekhar Bawankule’s district tour
