• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 July 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राष्ट्रीय हद्दीतील मासेमारीला १ ऑगस्टपासून परवानगी

by Mayuresh Patnakar
July 30, 2026
in Maharashtra
19 0
0
Permission for fishing within national waters
37
SHARES
107
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी. ता. 30 : राज्यातील मच्छीमारांना १ ऑगस्टपासून १२ सागरी मैलापलिकडील विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारीची परवानगी देण्यात आली आहे. किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात मात्र १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे. परंतु, हवामान विभागाकडून सातत्याने दिल्या जाणाऱ्या वादळी हवामानाच्या इशाऱ्यामुळे खोल समुद्रातील मासेमारीस १ ऑगस्टपासून पूर्ण क्षमतेने सुरुवात होण्याची शक्यता कमीच आहे. Permission for fishing within national waters

यंदा महाराष्ट्र शासनाने यांत्रिक मासेमारी नौकांसाठी १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत राज्याच्या प्रादेशिक जलक्षेत्रात मासेमारीबंदी लागू केली आहे. तर केंद्र शासनाने पश्चिम किनारपट्टीवरील विशेष आर्थिक क्षेत्रात ३१ जुलैपर्यंत म्हणजे ६१ दिवसांची बंदी लागू केली होती. त्यामुळे १ ऑगस्टपासून या क्षेत्रात मासेमारी पुन्हा सुरू होणार आहे. महाराष्ट्र शासनाने यंदा राज्याच्या प्रादेशिक जलक्षेत्रातील बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत एकूण ७६ दिवसांपर्यंत वाढविला असल्याने किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंतच्या समुद्रात या कालावधीत मासेमारी करण्यास परवानगी नाही. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करताना मच्छीमारांना मयदिचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. Permission for fishing within national waters

मत्स्यव्यवसाय विभागानेही मच्छीमारांना विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारी करताना लागू असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, बंदीच्या कालावधीत महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात बेकायदेशीररीत्या मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही विभागाने दिला आहे. गस्ती नौका सज्ज आहे का? १२ सागरी मैलापलिकडील राष्ट्रीय हद्दीत मासेमारीस परवानगी देण्यात आली असली तरी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत १५ ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी लागू राहणार आहे. परंतु एकसमान बंदी कालावधीअभावी राज्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी होणार नाही कशावरून आणि झालीच तर त्यावर कारवाई करण्यासाठी मत्स्य विभागाची गस्ती नौका सज्ज आहे का, हा सवाल पारंपरिक मच्छीमारांमधून उपस्थित होत आहे. Permission for fishing within national waters

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPermission for fishing within national watersटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.