विविध शाळांमध्ये ४३७ वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाचा संदेश
गुहागर, ता. 24 : पंचायत समिती गुहागर अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाला गुहागर केंद्रातील शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शाळा, घर, परिसर तसेच शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. ‘Ek Paid Maa Ke Naam’
गुहागर एज्युकेशन सोसायटी संचालित श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर येथे केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील व मुख्याध्यापिका सुजाता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी प्रगतशील शेतकरी दर्शन देवकर, माजी मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, नाईक सर, संतोष मोहिते, अविनाश गमरे, माने मॅडम आदी उपस्थित होते. ‘Ek Paid Maa Ke Naam’

उपक्रमांतर्गत गुहागर हायस्कूलने २१८, असगोली क्रमांक १ शाळेने ९२, अन्नपूर्णा विद्यालयाने ४०, गुहागर क्रमांक १ शाळेने ३६, गुहागर क्रमांक २ शाळेने १६, आरे भंडारवाडा शाळेने १५, आरे देवराठी शाळेने १०, तर गुहागर उर्दू शाळा व असगोली क्रमांक २ शाळेने प्रत्येकी ५ झाडांची लागवड केली. अशाप्रकारे विविध शाळांनी मिळून ४३७ वृक्षांची लागवड केली. ‘Ek Paid Maa Ke Naam’
यावेळी बोलताना केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील यांनी सांगितले की, ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाला गुहागर केंद्रातील सर्व शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विद्यार्थी शाळा परिसरासह आपल्या घर व शेतातही वृक्षलागवड करत आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण अत्यंत आवश्यक असून प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. ‘Ek Paid Maa Ke Naam’
