• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 July 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरमध्ये रक्तदान शिबिर

by Manoj Bavdhankar
July 21, 2026
in Guhagar
71 1
0
Blood donation camp in Guhagar
140
SHARES
399
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शिबिरात ८५ जणांची आरोग्य तपासणी तर ४३ जणांचे रक्तदान

गुहागर, ता. 21 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, गुहागर तालुक्याच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान अभियानाचा एक भाग म्हणून हे शिबिर गुहागर ग्रामीण रुग्णालयाच्या मागील इमारतीत आयोजित करण्यात आले होते. Blood donation camp in Guhagar

शिबिराचे उद्घाटन विधानपरिषदेचे आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, उपसभापती निलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर, अजित साळवी, नगराध्यक्षा निता मालप, तालुकाध्यक्ष अभय भाटकर, माजी सभापती सुरेश सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संकल्प अवेरे, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाडेकर, तालुका सरचिटणीस सचिन ओक, संतोष सांगळे, जिल्हा परिषद सदस्य अपूर्वा बारगोडे, पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी, स्नेहा शिगवण, मानसी रांगळे, महिला तालुकाध्यक्ष प्रांजल कचरेकर, शहराध्यक्ष नरेश पवार तसेच भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Blood donation camp in Guhagar

रक्त संकलनाचे काम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरीच्या रक्तकेंद्रामार्फत करण्यात आले. डॉ. अजयराज पवार, डॉ. लोकेश निंबोरे, भारती भोसले, जयश्री कुंडलकर, जागृती देशमुख, धनश्री पानवलकर, साईदीप बारगोडे आणि संदीप वाडे यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. शिबिरात ८५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४३ रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. Blood donation camp in Guhagar

या रक्तदान शिबिराला शिवसेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, राजेश बेंडल, सभापती प्रणव पोळेकर, तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल आणि अमरदीप परचुरे यांनी भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले व या सामाजिक आरोग्य उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. Blood donation camp in Guhagar

Tags: Blood donation camp in GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.