विद्यार्थ्यांनी घेतला शेतीचा प्रत्यक्ष अनुभव; कृषी संस्कृतीची ओळख
गुहागर, ता. 20 : गुहागर एज्युकेशन सोसायटी संचालित श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी भात लावणी प्रात्यक्षिकाची क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीचे प्रत्यक्ष ज्ञान आणि कृषी संस्कृतीची ओळख करून देण्यात आली. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी दर्शन देवकर आणि खातू मसाले उद्योगाचे संचालक शैलेंद्र खातू यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. Guhagar High School’s rice planting field visit

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरील अनुभव देण्याच्या उद्देशाने दर्शन देवकर यांच्या शेतात भात लावणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः लावणीत सहभाग घेत शेतीची मशागत, पेरणी, लावणी, कापणी, मळणी, आधुनिक यांत्रिकीकरण आणि बाजारपेठेची माहिती जाणून घेतली. यावेळी लायन सुधाकर कांबळे यांनी पारंपरिक व आधुनिक शेतीचे महत्त्व आणि शेतीचे अर्थकारण स्पष्ट केले. केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे योगदान अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे आवाहन केले. Guhagar High School’s rice planting field visit
कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी दर्शन देवकर आणि खातू मसाले उद्योगाचे संचालक शैलेंद्र खातू यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. यावेळी मुख्याध्यापिका सुजाता कांबळे, केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील, माजी मुख्याध्यापक तथा लायन्स क्लब गुहागरचे सचिव लायन सुधाकर कांबळे, प्रगतशील शेतकरी दर्शन देवकर, पर्यवेक्षिका गायत्री कनगुटकर, शिक्षक संतोष मोहिते, अविनाश गमरे, नाईक सर, माने मॅडम तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मोहिते यांनी केले, तर मुख्याध्यापिका सुजाता कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले. Guhagar High School’s rice planting field visit
