• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 July 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अपरान्तमध्ये डॉ. प्रियंका विखारे यांची ओपीडी सुरू

by Mayuresh Patnakar
July 16, 2026
in Health
51 0
0
Aparant Hospital Gynecology and Obstetrics Service
99
SHARES
284
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महिलांसाठी सर्वसमावेशक स्त्रीरोग व प्रसूती सेवा उपलब्ध

गुहागर, ता. 16 : अपरान्त मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. प्रियंका विखारे यांच्या ओपीडीचा शुभारंभ उत्साहात झाला. यावेळी अपरान्त हॉस्पिटलकडून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शहर व परिसरातील महिलांना दर्जेदार, सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने डॉ. प्रियंका विखारे (एमबीबीएस, डीजीओ, डीएनबी, एफआरएम, एफएमएएस) यांनी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ म्हणून रुजू होत सेवा सुरू केली आहे. Aparant Hospital Gynecology and Obstetrics Service

डॉ. विखारे यांच्या माध्यमातून गर्भधारणा, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी, मासिक पाळीशी संबंधित समस्या, वंध्यत्व उपचार, उच्च-जोखीम गर्भधारणेचे व्यवस्थापन, स्त्रीरोगांवरील शस्त्रक्रिया तसेच विविध स्त्रीरोगांवरील तज्ज्ञ उपचार एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. Aparant Hospital Gynecology and Obstetrics Service

स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र क्षेत्रातील सुमारे १४ वर्षांचा अनुभव असलेल्या डॉ. विखारे यांनी मुंबई, जयपूर, दिल्ली, फरीदाबाद आणि चिपळूण येथील विविध नामांकित रुग्णालयांमध्ये सेवा बजावली आहे. संतोष मेडिकल कॉलेज, गाझियाबाद येथून एमबीबीएस, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, पुणे येथून डीजीओ तसेच राजस्थान युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसमार्फत डीएनबी पदवी त्यांनी प्राप्त केली आहे.

रुग्णांशी आत्मीय संवाद, अचूक निदान आणि परिणामकारक उपचार ही त्यांची विशेष ओळख आहे. गर्भारपणातील नियमित तपासणी, उच्च-जोखीम गर्भधारणेचे व्यवस्थापन, सुरक्षित प्रसूती तसेच माता आणि नवजात बाळाच्या आरोग्याची सर्वंकष काळजी यावर त्यांचा विशेष भर असणार आहे. त्या दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत अपरान्त हॉस्पिटलमध्ये रुग्ण तपासणीसाठी उपलब्ध राहतील. Aparant Hospital Gynecology and Obstetrics Service

अपरान्त हॉस्पिटलमध्ये केईएम-प्रशिक्षित शल्यविशारद, हृदयविकार, मधुमेह, अस्थिरोग, श्वसनविकार, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी तसेच विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध असून, २४x७ आपत्कालीन सेवाही सुरू आहे. अपॉइंटमेंटसाठी ७९९८८९८९८९, ७९९८७३७३७३ किंवा (०२३५५) २५४२५४ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. सावित्री एन्क्लेव्ह, एलआयसी कार्यालयासमोर, भोगाळे, चिपळूण येथे स्थित असलेल्या अपरान्त हॉस्पिटलने “आरोग्याच्या सर्व सेवा – एकाच छताखाली” या ध्येयवाक्यानुसार महिलांसाठी अधिक सक्षम, सुरक्षित आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. Aparant Hospital Gynecology and Obstetrics Service

Tags: Aparant Hospital Gynecology and Obstetrics ServiceGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share40SendTweet25
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.