• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 July 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ताजी मासळी निर्यातीचा मार्ग मोकळा

by Mayuresh Patnakar
July 16, 2026
in Maharashtra
47 0
0
Path cleared for fresh fish exports
92
SHARES
262
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांना मोठी संधी

गुहागर, ता. 16 : भारत आणि ब्रिटन यांच्यात झालेल्या महत्त्वाच्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार अंतर्गत आता थेट ब्रिटनमध्ये ताज्या आणि शीतगृहात ठेवलेल्या मासळीची निर्यात सुरू होणार आहे. ‘सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण’ या उपक्रमाला गती देत आहे. यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांना आणि स्थानिक मत्स्य उद्योगाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी बाजारपेठ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Path cleared for fresh fish exports

या करारामुळे भारतीय सागरी उत्पादनांना ब्रिटनच्या बाजारपेठेत शून्य-शुल्क प्रवेश मिळणार आहे. विशेषतः कोकणातील पापलेट, सुरमई, कोळंबी आणि स्क्विड (म्हाकुल) यांसारख्या उच्च दर्जाच्या मासळीला या करारांतर्गत मोठी मागणी राहण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी ब्रिटनमध्ये मासे आणि कोळंबीच्या निर्यातीवर जवळपास ८.५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क आकारले जात होते. जे आता पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय मासळीचे दर अधिकस्पर्धात्मक होतील. ब्रिटनमध्ये राहणारे भारतीय नागरिक आणि तिथल्या ग्राहकांमध्ये प्रक्रिया केलेल्या तसेच ताज्या दर्जेदार सागरी खाद्यपदार्थांना मोठी मागणी आहे, ज्याचा थेट फायदा आता भारतातील किनारपट्टी भागांना होणार आहे. Path cleared for fresh fish exports

 कोकणातील मच्छीमारांच्या दृष्टीने ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे कारण निर्यातीमधील शुल्क सवलतीचा थेट फायदा स्थानिक स्तरावर माशांना मिळणाऱ्या दरांमध्ये होणार आहे. कंपन्यांकडून मासळीची खरेदी वाढल्यास मच्छीमारांच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडेल. तसेच ताज्या मासळीची निर्यात करण्यासाठी आधुनिक शीतगृहे, पॅकेजिंग आणि प्रक्रिया उद्योगांचे जाळे कोकणात विस्तारू शकते. या सुवर्णसंधीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी मच्छीमारांनी आणि स्थानिक निर्यातदारांनी आता मासळीचा दर्जा, स्वच्छता आणि आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे. Path cleared for fresh fish exports

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPath cleared for fresh fish exportsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share37SendTweet23
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.