• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 July 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणपतीचे बुकिंग फुल्ल झाले !

by Mayuresh Patnakar
July 13, 2026
in Maharashtra
71 0
1
Ganpati bookings are full
139
SHARES
396
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वेटिंग तिकीटही मिळेना; कोकणवासीयांची चिंता वाढली

मुंबई, ता. 13 : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे तिकीट बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत सर्व तिकिटे फुल्ल झाली आहेत. अनेक महत्त्वाच्या गाड्यांची वेटिंग लिस्टदेखील आता संपली आहे. त्यामुळे कोकणवासीयांची चिंता वाढली असून बाप्पाच्या दर्शनासाठी गावी जायचे कसे, असा मोठा प्रश्न चाकरमान्यांसमोर उभा राहिला आहे. Ganpati bookings are full

कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर आणि जल्लोषात साजरा केला जातो. या काळात ठाणे जिल्हा, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर तसेच मुंबई महानगर प्रदेशातील लाखो चाकरमानी आपल्या गावी जातात. रेल्वे सुटण्याच्या ६० दिवस आधीपासून रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्यास सुरुवात झाली आहे. १० जुलैपासून ८ सप्टेंबर रोजीचे तिकीट काढण्यास सुरुवात झाली आहे, तर ११ जुलै रोजी ९ सप्टेंबर रोजीचे तिकीट काढण्यात येत होते. विशेष गाड्यांची मागणी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या जाहीर केल्या जातात. या वर्षीही अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात याव्यात तसेच विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात याव्यात अशी मागणी कोकणवासी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. पुढील आरक्षण कधी आणि किती तारखेला… गणेश चतुर्थीला कोकण रेल्वे मागांवर कोकणकन्यासह अन्य नियमित धावणाऱ्या ट्रेनचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू होणार आहे. तसेच गौरीच्या आगमनाला जाणान्या कोकणवासीयांची संख्याही मोठी आहे. यंदा १७ सप्टेंबरला गौरी आगमन आणि १८ सप्टेंबरला गौरीपूजन आहे. या १७ सप्टेंबरला सुटणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण १९ जुलै रोजी होणार आहे. Ganpati bookings are full

दरवर्षीप्रमाणे यंदाही नियमित गाड्यांचे आरक्षण सुरू होताच प्रवाशांनी तिकिटे बुक करण्यासाठी एकच गर्दी केली; परंतु काही वेळातच मुंबई-गोवा महामार्गावरील कोकणकन्या, मंगळुरू एक्स्प्रेससह प्रमुख गाड्यांच्या सर्व जागा फुल्ल झाल्या आहेत. कोकणकन्या एक्स्प्रेसच्या ८ आणि ९ सप्टेंबर रोजीची वेटिंग लिस्ट वाढत चालली आहे. त्यामुळे नियमित आरक्षणातून तिकीट मिळण्याची शक्यता अत्यंत कमी झाली आहे. ९ सप्टेंबर रोजीची वंदे भारत ट्रेनची तिकिटे वेटिंग लिस्टवर गेली असून, ती वाढत चालली आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस, वांद्रे-मडगाव एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस या सर्व ट्रेनची वेटिंग लिस्ट वाढत चालली असून कोकणकन्या एक्स्प्रेस, मंगळुरू एक्स्प्रेस, सुरत-मंगळुरू एक्स्प्रेस, पुणे एर्नाकुलम एक्स्प्रेस या गाड्यांची ९ सप्टेंबर रोजीची वेटिंग तिकीट मिळणेही बंद झाले आहे. Ganpati bookings are full

Tags: Ganpati bookings are fullGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.