• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 July 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अंजनवेल येथील गॅस कंपनीवर जप्तीचा इशारा

by Mayuresh Patnakar
July 11, 2026
in Guhagar
59 1
0
Company in trouble due to unpaid taxes
117
SHARES
333
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीकडून जमीन व इमारत कराची सुमारे ४ कोटी २८ लाख ५९ हजार ३०७ रुपये इतकी थकबाकी वसूल करण्यासाठी अंजनवेल, रानवी आणि वेलदूर ग्रामपंचायतींनी २८ जुलै २०२६ रोजी कंपनीवर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती अंजनवेलच्या सरपंच सोनाली मोरे, रानवीच्या प्रशासक सरपंच मनाली कदम आणि वेलदूरच्या सरपंच दिव्या वनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. Company in trouble due to unpaid taxes

पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, सन २०२०-२१ पर्यंत तब्बल १६ वर्षे कंपनीने संबंधित ग्रामपंचायतींना जमीन व इमारत कर नियमित भरला होता. मात्र सन २०२१-२२ पासून कंपनीने कर भरण्यास नकार दिला. सरकारी कंपनी असल्याने ग्रामपंचायतीचा जमीन व इमारत कर भरणे बंधनकारक नसल्याचा दावा कंपनीने केला होता.

याप्रकरणी गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी दोन्ही बाजू ऐकून १४ जून २०२२ रोजी कंपनीला तातडीने कर भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कंपनीने जिल्हा परिषद रत्नागिरीच्या स्थायी समितीकडे अपील केले; मात्र ते फेटाळण्यात आले. पुढे कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असली, तरी जिल्हा परिषदेच्या ३ एप्रिल २०२४ च्या आदेशाला न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ नुसार कर वसुलीची कारवाई करण्याचा ग्रामपंचायतींना अधिकार असल्याचा दावा सरपंचांनी केला. Company in trouble due to unpaid taxes

ग्रामपंचायतींनी २०२१-२२ आणि २०२२-२३ या कालावधीतील थकीत करासाठी मागणी हुकूम बजावला असून, कंपनीशी अनेक वेळा चर्चा करूनही तोडगा निघाला नसल्याचे त्यांनी सांगितले. कर न मिळाल्यामुळे विकासकामांसाठी निधीची कमतरता निर्माण होऊन अनेक कामे ठप्प झाल्याचेही त्यांनी नमूद केले. Company in trouble due to unpaid taxes

या पार्श्वभूमीवर तिन्ही ग्रामपंचायतींच्या मासिक सभा व ग्रामसभांमध्ये ठराव मंजूर करून २८ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या कारवाईची लेखी नोटीस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), गटविकास अधिकारी (पंचायत समिती) आणि गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. Company in trouble due to unpaid taxes

Tags: Company in trouble due to unpaid taxesGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share47SendTweet29
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.