गुहागर, ता. 09 : तालुक्यातील विसापूर-पांगारी मुख्य रस्ता मुसळधार पावसाच्या तडाख्याने खचून वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, रस्त्याच्या मधोमध मोठी भेग पडून मोठा भाग खचल्याने गुहागर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीला युद्ध पातळीवर सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या पायाभूत संरचनेलाच मोठा फटका बसला आहे. Work on Visapur-Pangari damaged road begins

रस्ता धोकादायक झाल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी तसेच एसटी बससेवाही ठप्प झाली असून परिसरातील अनेक गावांचा संपर्क विस्कळीत झाला आहे. या मार्गावरून दररोज शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या पांगारी, विसापूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना लांबच्या पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागत असून काहींना जीव धोक्यात घालून पायी प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, गुहागर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तेथील तुटलेली मोरी आणि खचलेला रस्ता यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरु झाले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी अंजनवेल येथील रस्त्याची साईड पट्टी खचली होती. तेथील काम सुरु असल्याची माहिती उपभियांता स्वप्नील पाटील यांनी दिली. Work on Visapur-Pangari damaged road begins
