गुहागर, ता. 07 : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पांगारी तर्फे हवेलीकडे जाणारा मुख्य रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. Road at Pangari Tarfe Haveli has caved in

रस्ता खचल्यामुळे वाहनचालकांसह परिसरातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. संबंधित ठिकाणी आणखी रस्ता खचण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, नागरिकांनी या मार्गावरून प्रवास टाळावा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Road at Pangari Tarfe Haveli has caved in
