लायन्स क्लबतर्फे सत्कार, गुहागर तालुकावासीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव
गुहागर, ता. 5 : एखाद्या लेखकाच्या साहित्याला पाठ्यपुस्तकात, संदर्भ ग्रंधात स्थान मिळते तेव्हा पुरस्कारांहून अधिक आनंद त्या लेखकाला होतो. असाच सन्मान गुहागरमधील राजेंद्र आरेकर यांना मिळाला आहे. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात, शिकू मराठी आनंदाने द्वितीय भाषा (इंग्रजी माध्यम) इयत्ता सहावी या पुस्तकात राजेंद्र आरेकर यांच्या आई या काव्यसंग्रहातील नवा ऋतू या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. rajendra-arekar-poem-in-balbharati-textbook
एस.टी. महामंडळाच्या गुहागर Guhagar S.T. Depoआगारात कॅशियर म्हणून सेवानिवृत्त झालेले राजेंद्र आरेकर यांना वाचनाचा छंद आहे. विविध विषयांवरील पुस्तके वाचता वाचता त्यांच्या हळव्या मनातील कवी जागा झाला आणि त्यातूनच आई नावाचा पहिला कवितासंग्रह त्यांनी लिहिला. या कवितासंग्रहातील माझे कोकण ही कविता खूप गाजली. अनेक कार्यक्रमातून माझे कोकण या संगीतबध्द कवितेने लोकांच्या मनाचा ठाव घेतला. आई या विषयावर एक कवितासंग्रह प्रकाशित झाल्यानंतर दिर्घकाळाने पुन्हा एकदा साद आईस या नव्या कवितासंग्रहाची निर्मिती त्यांनी केली. त्यानंतर आत्मचरित्र लिहिण्यास सुरूवात केली. आज हे पुस्तकही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. rajendra-arekar-poem-in-balbharati-textbook

कवी मनाच्या आणि पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या राजेंद्र आरेकर यांनी गुहागरमधील ज्ञानरश्मि वाचनालयाचा कायापालट केला. साहित्यावरील प्रेमापोटी गुहागरमध्ये साहित्य संमेलने भरविली. त्यांच्या या साहित्य सेवेची दखल कोणी घेतली नसती तरच नवल. शिवांजली साहित्य गौरव पुरस्कार, अण्णाभाऊ साठे साहित्य सेवा पुरस्कार, कोकण दिपचा कोकणरत्न पुरस्कार, राज्यस्तरीय विश्र्वसमता काव्य गौरव पुरस्कार, महाराष्ट्र पत्रकार संघाचा कवीरत्न पुरस्कार, जेसीआय काव्य लेखन पुरस्कार, सम्मारबुध्द कल्याणमित्र पुरस्कार असे 7 पुरस्कार त्यांना मिळाले. अखिल भारतीय साहित्य संमेलनात काव्यवाचनाची संधी देवून त्यांचा Rajendra Arekar सन्मान करण्यात आला. rajendra-arekar-poem-in-balbharati-textbook
अशा पुरस्कारांकित राजेंद्र आरेकर यांना जून महिन्यात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती यांचे पत्र आले. त्यांच्या आई या कवितासंग्रहातील नवा ऋतू या कवितेचा समावेश पाठ्यपुस्तकात education करण्याची अनुमती देण्याबाबत विनंती करण्यात आली होती. या पत्राने राजेंद्र आरेकर यांच्या आनंदाला उधाण आले. गुहागरच्या साहित्य वर्तुळातून, मित्र परिवाराकडून त्यांच्यावर अक्षरश: शुभेच्छांचा वर्षाव झाला. हाच खरा पुरस्कार असल्याची भावना त्यांच्या मनात तरळून गेली. rajendra-arekar-poem-in-balbharati-textbook
गुहागर तालुक्यातील सुपुत्राच्या काव्यरचेनेचा अभ्यासक्रमात Balbharati समावेश होण्याचा अभिमान आज तालुकावासीयांना आहे. याची नोंद घेत लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी ( Lions Club of Guhagar City) 1ने आज त्यांचा सन्मान केला. एमएफजे लायन प्रांजल गुंजाळ, चिपळूणच्या लायन थरकार मॅडम, गुहागरच्या नगराध्यक्षा सौ. निता मालप, गुहागर क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष खरे, पूर्व अध्यक्ष सचिन मुसळे यांच्यासह गुहागर क्लबचे सर्व संचालक, सभासद आणि पदग्रहण सभारंभाला उपस्थित गुहागरमधील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थित राजेंद्र आरेकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
