गुहागर, ता. 27 : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत अन्नप्रक्रिया व पशुखाद्य उद्योग उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून एकूण प्रकल्प खर्चाच्या जास्तीत जास्त 35 टक्के अनुदान उपलब्ध आहे. वैयक्तिक लाभार्थ्यांना कमाल 10 लाख रुपयांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळू शकतो. तसेच सरकारी व खासगी बँकांमार्फत विनातारण कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते. Subsidies for food processing industries

या योजनेत सर्व प्रकारचे अन्नप्रक्रिया उद्योग आणि पशुखाद्य उद्योगांचा समावेश असून, नवीन उद्योगासोबतच आधीपासून सुरू असलेल्या उद्योगांच्या विस्तारीकरणासाठीही अर्ज करता येतो. विस्तारीकरण पूर्ण झाल्यानंतरही अनुदानाचा लाभ मिळू शकतो. कृषी विभागाच्या जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP) मार्फत लाभार्थ्यांना फाईल तयार करणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, ऑनलाइन अर्ज भरणे, बँकेचा कर्ज प्रस्ताव तयार करणे, कर्जासाठी अर्ज करणे, उद्योग स्थापनेसंदर्भात मार्गदर्शन करणे तसेच उद्योग सुरू झाल्यानंतर अनुदान प्रस्ताव तयार करून अनुदान खात्यात जमा होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य करून दिली जाते. Subsidies for food processing industries
याशिवाय, दर्जेदार मशिनरीसाठी विश्वासार्ह पुरवठादारांचे कोटेशन मिळवण्यासाठीही आवश्यक सहाय्य केले जाते. इच्छुक उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेऊन अन्नप्रक्रिया किंवा पशुखाद्य उद्योग उभारण्यासाठी अथवा विस्तारासाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Subsidies for food processing industries
