• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

धोपावेत मोफत नेत्रतपासणी शिबिर

by Mayuresh Patnakar
June 27, 2026
in Guhagar
35 0
0
Eye Check-up Camp at Dhopave
69
SHARES
196
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

१९ रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

गुहागर, ता. 27 : तालु्क्यातील ग्रामपंचायत धोपावे यांच्या पुढाकारातून समता फाउंडेशन, भ. क. ल. वालावलकर रुग्णालय (डेरवण), प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली व उपकेंद्र धोपावे यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. Eye Check-up Camp at Dhopave

Eye Check-up Camp at Dhopave

शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची नेत्र तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. तपासणीनंतर मोतीबिंदू असलेल्या १९ रुग्णांची निवड करण्यात आली. या सर्व रुग्णांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया भ. क. ल. वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे पूर्णपणे मोफत करण्यात आल्या.

Eye Check-up Camp at Dhopave

रुग्णांच्या ने-आण व्यवस्थेसह रुग्णालयातील निवास, भोजन आणि शस्त्रक्रियेनंतर आवश्यक काळा चष्माही विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला. या उपक्रमामुळे अनेक रुग्णांना पुन्हा स्पष्ट दृष्टी लाभली असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांनाही दर्जेदार आरोग्यसेवेचा लाभ मिळाला. Eye Check-up Camp at Dhopave

Eye Check-up Camp at Dhopave

सलग तिसऱ्या वर्षी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत करत आयोजक संस्थांचे आभार मानले. भविष्यातही अशाच लोकोपयोगी आरोग्य शिबिरांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. Eye Check-up Camp at Dhopave

Tags: Eye Check-up Camp at DhopaveGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share28SendTweet17
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.