गुहागर, ता. 23 : वाढदिवस हा अनेकांसाठी आनंदोत्सवाचा दिवस असतो. मात्र या दिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्शवत उपक्रम सौ. पूर्वा अनिल पडवेकर यांनी राबविला. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आरती निराधार सेवा फाऊंडेशन, मालघर (ता. चिपळूण) येथे भेट देऊन तेथील वृद्ध, दिव्यांग व निराधार बांधवांना फळांचे वाटप केले. यावेळी त्यांच्या सासू-सासरे कै. तुकाराम नारायण पडवेकर आणि कै. सुनंदा तुकाराम पडवेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री संत गोरा कुंभार युवा प्रतिष्ठान, रत्नागिरी यांच्या वतीने संस्थेला व्हीलचेअर भेट देण्यात आली. मानवसेवेचा एक छोटासा प्रयत्न म्हणून करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. Social service on birthday
समाजातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि निराधार व्यक्तींना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी व्हीलचेअरसारखी सहाय्यक साधने त्यांच्यासाठी मोठा आधार ठरतात. या माध्यमातून त्यांना अधिक स्वावलंबी आणि सुलभ जीवन जगण्यास मदत होणार असून, सेवा संस्थांमधील आवश्यक सुविधांमध्येही भर पडणार आहे. Social service on birthday

“मानव सेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम केवळ वस्तूदानापुरता मर्यादित नसून समाजाप्रती असलेल्या कर्तव्यभावनेची आणि सामाजिक जाणीवेची प्रचिती देणारा आहे. गरजू व्यक्तींच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे आणि त्यांच्या जीवनप्रवासात आधाराचा हात देणे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. Social service on birthday
या समाजोपयोगी कार्यक्रमास कुंभार समाज रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष गुडेकर, चिपळूण तालुका अध्यक्ष श्री. प्रकाश निवळकर, ज्येष्ठ समाजसेवक श्री. जनार्दन मालवणकर, जिल्हा संघटक श्री. यशवंत (नाना) पालकर, श्री संत गोरा कुंभार युवा प्रतिष्ठानचे युवा जिल्हाध्यक्ष श्री. महेश पडवेकर, ज्येष्ठ समाजसेवक प्रमोद (बावा) निवळकर, सचिव श्री. सुधीर जामसुतकर, सहसचिव श्री. अमित बुरबाडकर, कुंभार समाज सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्री. रविंद्र शिरकर, प्रतिष्ठान सदस्य श्री. सुनिल पडवेकर, उपाध्यक्ष श्री. योगेश गुहागरकर, खजिनदार श्री. अनिल पडवेकर, सौ. स्वप्नाली सुनिल पडवेकर तसेच अथर्व व स्पृहा अनिल पडवेकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. Social service on birthday
समाजातील गरजू, दिव्यांग आणि निराधार घटकांच्या सेवेसाठी भविष्यातही अशाच प्रकारचे सेवाभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. माणुसकीची खरी ओळख ही सेवा, संवेदनशीलता आणि सामाजिक उत्तरदायित्वातूनच निर्माण होते, याची प्रचिती या उपक्रमातून पुन्हा एकदा आली. Social service on birthday