• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 June 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळेच्या 1984 मधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

by Mayuresh Patnakar
June 22, 2026
in Guhagar
107 1
0
Patpanhale High School Alumni Reunion
209
SHARES
598
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 : गुरुजनांसह शिष्यांनी पद, प्रतिष्ठा, मानसन्मान व पैसा बाजूला ठेवल्यास खऱ्या अर्थाने गेट टुगेदर यशस्वी होईल, असे मौलिक मार्गदर्शन पाटपन्हाळे न्यू इंग्लिश स्कूलचे माजी शिक्षक अरुण परचुरे यांनी माजी विद्यार्थ्यांना केले. पाटपन्हाळे स्कूलच्या 1984 तुकडीच्या जुन्या शालेय मित्रांचे अनौपचारिक स्नेहसंमेलन चिखली साळवी येथील मधुबन हाँटेल येथे रविवारी पार पडले. यावेळी 42 वर्षांनी प्रथमच एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक परचुरे यांनी केले. Patpanhale High School Alumni Reunion

व्यासपीठावर गुरुवर्य शरदचंद्र पोंक्षे, सौ. वर्षा पोंक्षे, रामचंद्र बुरुंगळे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. परचुरे सरांनी मार्गदर्शन करताना आता सोशल मीडियाचा प्रभाव असल्याने व्हॉटसअॅप ग्रुप करताना व त्यावर मेसेज टाकताना विचारपूर्वक तो टाकावा, असे समजावून सांगितले. आज तुम्ही 22 जण प्रथमच एकत्र आलात पुढच्च्यावेळी तुमच्या बॅचचे सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र येतील असे पहावे. त्यांना संपर्क साधताना थोडाफार मनस्ताप होईल, कारण प्रत्येकजण कुटुंबात आहे. त्यामुळे सगळेच तुमच्यामध्ये सहभागी होण्यास टाळाटाळ करतील. तरीही नाराज न होता त्यांना समजावून सांगून ग्रुप करावा व गेट टुगेदरसारखे कार्यक्रम साजरे करावेत, हाच खरा जीवनातील आनंद असल्याचे त्यांनी पटवून दिले. Patpanhale High School Alumni Reunion

बुरुंगळे सर यांनी पूर्वीची शिक्षण पध्दती आणि आताची पध्दती यातील फरक सांगितला. त्यावेळी शिकवणी करताना येणाऱ्या अडचणी, त्यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षा केल्यावर फारशा तक्रारी येत नव्हत्या. आता मात्र, विद्यार्थ्यांना साधे ओरडणेही शिक्षकांसाठी शिक्षा ठरत असल्याचे सांगून त्यावेळचा शाळेतील आलेला एक कटु अनुभव त्यांनी सांगून त्यातून कसे बाहेर पडलो, याची आठवण करुन दिली. यावेळी उपस्थित गुरूंना भेटवस्तू व शाल, श्रीफळ देऊन त्यांचा माजी विद्यार्थ्यांनी सन्मान केला. Patpanhale High School Alumni Reunion

यावेळी माजी विद्यार्थी रशीद बेबजी, तुळशीदास साळवी, प्रदिप साळवी, सुधाकर साळवी,  सदानंद विचारे, रघुनाथ जानवळकर, संतोष पांचाळ, प्रशांत लेले, विनय आरेकर, रवींद्र शिरकर, किशोर कदम, संजय नांदळस्कर, रशीद केळकर, वासुदेव ठाणकर, सुरेश पागडे, अनिल रहाटे, जनार्दन पालकर, संजय साळवी, संजय दळवी आदी उपस्थित होते. Patpanhale High School Alumni Reunion

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPatpanhale High School Alumni Reunionटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share84SendTweet52
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.