• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 June 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वास्तुशांतीनिमित्त भाटी येथे आरोग्य शिबिर

by Guhagar News
June 20, 2026
in Ratnagiri
47 1
0
Health camp at Bhati
93
SHARES
265
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

निसर्गोपचार मार्गदर्शन शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गुहागर, ता. 20 : कैलासवासी प्रकाश शंकर खडपकर यांच्या वास्तुशांती नूतनीकरण व सत्यनारायण पूजनाच्या निमित्ताने खडपकर परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत भाटी येथे मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री हनुमान मंदिर येथे आयोजित या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. Health camp at Bhati

डॉ. प्रशांत प्रकाश खडपकर व सौ. माधुरी प्रशांत खडपकर यांनी निसर्गोपचार, कायरोथेरपी तसेच विविध आजारांवरील उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. भाटी पश्चिमवाडी येथील पाटील, कारभारी, ग्रामस्थ मंडळ तसेच महिला भगिनी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. Health camp at Bhati

शिबिरामध्ये ग्रामस्थ बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्यविषयक सल्ल्याचा लाभ घेतला. या सामाजिक उपक्रमाची संकल्पना पोलीस निरीक्षक प्रफुल्ल खडपकर तसेच प्रमोद, रणजीत, प्रतिभा आणि प्रकाश खडपकर यांनी मांडली होती. Health camp at Bhati

शिबिरानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने गावचे पाटील बंडू नाटेकर यांच्या हस्ते डॉ. प्रशांत खडपकर व सौ. माधुरी खडपकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच खडपकर परिवाराच्या वतीने बंडू नाटेकर यांचाही टोपी, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. Health camp at Bhati

कार्यक्रमाच्या शेवटी श्री. उदय वायंगणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. खडपकर परिवाराने या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या भाटी ग्रामस्थ मंडळ, महिला भगिनी तसेच सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. Health camp at Bhati

Tags: GuhagarGuhagar NewsHealth camp at BhatiLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share37SendTweet23
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.