गुहागर, ता. 18 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा असगोली 1 एक या शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. यावेळी सुशोभित शिक्षण रथासह गावामध्ये प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. पहिलीतील विद्यार्थ्यांचे पावलांचे ठसे घेवून आठवण म्हणून संग्रही ठेवण्यासाठी पालकांना देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पाठ्यपुस्तक व मोफत गणवेशाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे वेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. School Enrollment Festival at Asgoli School

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री झगडे सर यांनी केले. पहिली दाखल होणाऱ्या सर्व नवागत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ग्राम विकास अधिकारी शिरसागर, दशरथ पवार यांनी मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील यांनी शाळा व्यवस्थापन समिती च्या सहकार्याने अतिशय नाविन्यपूर्ण असा शाळा प्रवेशोत्सव उपक्रम यशस्वी केल्याबद्दल धन्यवाद दिले. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत लोकसहभागातून अशाच पद्धतीचे विविध उपक्रम यशस्वी करण्याचे त्यांनी आवाहन केले. सरपंच छाया कटनाक व अध्यक्ष संजना रायकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. School Enrollment Festival at Asgoli School

यावेळी असगोली ग्रामपंचायतचे सरपंच छाया कटनाक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजना रायकर मॅडम, उपाध्यक्ष कावनकर मॅडम, मा. अध्यक्ष ज्ञानेश्वर झगडे, केंद्रप्रमुख मनोज पाटील, ग्रामविकास अधिकारी शिरसागर साहेब, ग्रामपंचायत सदस्य जाधव मॅडम, अंगणवाडी सेविका झगडे मॅडम, रायकर मॅडम, मुख्याध्यापक चंद्रकांत झगडे, जयश्री पावसकर, जेष्ठ ग्रामस्थ मधुकर कावणकर, सामाजिक कार्यकर्ते दशरथ पवार, प्रदीप पवार, अंजली मुद्दमवार, दीक्षा गुरव, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. School Enrollment Festival at Asgoli School
