गुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे आयोजित संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2025-26 मध्ये गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने 198 गुणांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. राजापूरची खरवते ग्रामपंचायत द्वितीय (193 गुण) तर रत्नागिरीची पानवल ग्रामपंचायत तृतीय (179 गुण) ठरली. विशेष पुरस्कारांमध्ये गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीने स्व. वसंतराव नाईक पुरस्कार (घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (पाणी गुणवत्ता व व्यवस्थापन) असे दोन पुरस्कार पटकावले. स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार (शौचालय व्यवस्थापन) संगमेश्वरच्या माखजन ग्रामपंचायतीला मिळाला. खामशेत व उमराठ ग्रामपंचायतींच्या या यशामुळे गुहागर तालुक्याचा मान उंचावला असून सर्व संबंधितांचे अभिनंदन करण्यात आले आहे. Khamshet Gram Panchayat first in cleanliness campaign

जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागातर्फे प्रतीवर्षी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धा आयोजित करण्यात येते. जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर आणि रत्नागिरी असे एकूण ९ तालुके असून या सर्व तालुक्यांत मिळूण एकूण ८४७ ग्रामपंचायती आहेत. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धा या वर्षीसुद्धा सन २०२५-२६ अंतर्गत जिल्हा परिषद रत्नागिरी गटामधील एकूण ८४७ ग्रामपंचायतीमधून प्रथम क्रमांकाच्या सर्वात जास्त गुण प्राप्त करणाऱ्या फक्त पहिल्या १ ते ९ क्रमांकाच्या ग्रामपंचायतींची तपासणी, जिल्हास्तरीय तपासणी समितीकडून करून जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीची गुणांकनानुसार निश्चित करण्यात आले. Khamshet Gram Panchayat first in cleanliness campaign
तसेच विशेष पुरस्कारासाठी सुद्धा जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत असलेल्या एकूण ८४७ ग्रामपंचायतीं मधून तीन ग्रामपंचायतीची गुणानुक्रमे निवड करण्यात आली आहे. यामध्ये स्व. वसंतराव नाईक पुरस्कार (घनकचरा, सांडपाणी व मैलागाळ व्यवस्थापन) यासाठी गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठची (एकूण ५६ गुणांपैकी ४८ गुण) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन) यासाठी सुद्धा ग्रामपंचायत उमराठची (एकूण ३० गुणांपैकी २६ गुण) निवड करण्यात आली आहे. असे एकाच वेळी दोन विशेष पुरस्कार ग्रामपंचायत उमराठने पटकावले आहेत. तसेच स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार (सौचालय व्यवस्थापन) यासाठी संगमेश्वरच्या ग्रामपंचायत माखजनची (एकूण ६७ गुणांपैकी ६२) निवड करण्यात आली आहे. Khamshet Gram Panchayat first in cleanliness campaign
