पक्षी ब्राऊन बूबी (Brown Booby) प्रजातीचा असल्याची शक्यता
गुहागर, ता. 16 : गुहागर समुद्रकिनारी दुर्मिळ समुद्री पक्षी आढळून आला आहे. सदरचा पक्षी ब्राऊन बुबी (Brown Booby) प्रजातीचा असल्याची शक्यता पक्षीप्रेमींकडून वर्तवली जात आहे. समुद्रात मासेमारी करणारा आणि क्वचितच किनाऱ्यावर दिसणारा हा पक्षी असून या पक्ष्याचे दर्शन होताच पर्यटक आणि पक्षीप्रेमींमध्ये एक उत्सुकता निर्माण झाली. Rare bird found on Guhagar beach

हा पक्षी हवामानातील बदल किंवा जोरदार वाऱ्यांमुळे येथील समुद्र किनाऱ्यावर आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गुहागर समुद्र किनाऱ्यावर सध्या अनेक पर्यटक येत आहेत. त्यामुळे याठिकाणी अद्यापही गर्दी झालेली दिसून येत होती. सुट्टीचा हंगाम आता संपल्याने ही गर्दी कमी झाली आहे. सध्या हवामानात होत असलेला बदल यामुळे हा पक्षी येथील समुद्र किनाऱ्यावर आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. साधारणता मच्छीमारी करणारा हा पक्षी असून हा पक्षी दुर्मिळ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची उत्सुकता वाढली होती. Rare bird found on Guhagar beach
