• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पडवे-तवसाळ येथे तरूणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

by Mayuresh Patnakar
June 16, 2026
in Guhagar
237 2
0
Youth drowns to death
465
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पडवे-तवसाळ येथे नदीत पोहण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संजोग शशिकांत सुर्वे (वय ३५, रा. पडवे भंडारवाडा, ता. गुहागर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. Youth drowns to death

याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी संजोग सुर्वे हा त्याचे मित्र निखिल सुर्वे, विनायक गडदे आणि अक्षय सुर्वे यांच्यासह बाहेर गेला होता. त्यानंतर हे सर्वजण पडवे-तवसाळ येथील महामाई सोनसाखळी गावदेवी मंदिराजवळील नदीत पोहण्यासाठी उतरले. पोहत असताना संजोग सुर्वे याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला आणि पाण्यात बुडाला. मित्रांनी तत्काळ त्याला बाहेर काढले. त्या वेळी त्याच्या नाका-तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले. त्याचा जीव वाचविण्यासाठी मित्रांनी प्रयत्न केले. अक्षय सुर्वे याने कृत्रिम श्वसन देण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर संजोग सुर्वे याला तातडीने रुग्णवाहिकेतून हेदवी येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोली येथे हलविण्यात आले.  Youth drowns to death

मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पडवे भंडारवाडा परिसरात शोककळा पसरली आहे.  Youth drowns to death

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarYouth drowns to deathटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share186SendTweet116
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.