• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वाकी शाळेच्या वर्गखोल्यांची होणार दुरुस्ती

by Mayuresh Patnakar
June 15, 2026
in Guhagar
16 0
0
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शिक्षण सभापतींचे आश्वासन, पालकांचे आंदोलन मागे

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील वाकी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या नादुरुस्त वर्गखोल्यांच्या प्रश्नावर अखेर प्रशासनाने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली असून शिक्षण सभापतींनी दिलेल्या आश्वासनानंतर पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस आनंददायी वातावरणात पार पडणार आहे. Classrooms at Waki ​​School to undergo repairs

वाकी शाळेच्या एकूण चार वर्गखोल्यांपैकी दोन वर्गखोल्या पूर्णपणे नादुरुस्त व धोकादायक अवस्थेत होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आले होते. ग्रामस्थ व पालकांनी वारंवार पाठपुरावा करूनही या प्रश्नाची दखल घेतली जात नसल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. अखेर सर्व पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला होता. Classrooms at Waki ​​School to undergo repairs

या संदर्भातील सविस्तर वृत्त दैनिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर गुहागर पंचायत समितीचे सभापती श्री. प्रणव पोळेकर यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी शाळा दुरुस्तीसाठी आवश्यक प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठविण्याची कार्यवाही केली. त्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती श्री. नंदकुमार मुरकर यांनी ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करून येत्या काही दिवसांत उर्वरित दोन वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या. Classrooms at Waki ​​School to undergo repairs

प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. याबद्दल वाकी शाळेचे पालक, ग्रामस्थ तसेच गाव विकास कमिटीने संबंधित लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि दैनिक सकाळ चे आभार व्यक्त केले आहेत.

लोकप्रतिनिधींचे महत्त्व अधोरेखित

जिल्ह्यातील अनेक शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक विभागाकडे धूळ खात पडले आहेत. वा वाकी शाळेचा प्रस्तावही अशाच वर्षभरापूर्वी जिल्हा परिषदेकडे गेला होता मात्र प्रशासना ने या प्रस्तावांकडे पाहिलेच नव्हते वाकीतील ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे हा विषयाचे गांभीर्य लोकप्रतिनिधींना समजलं पंचायत समिती ते जिल्हा परिषद याची चर्चा झाली आणि तातडीने लोकप्रतिनिधींनी समस्येवर मार्ग काढला. शाळांच्या दुरुस्तीच्या दुर्लक्षित प्रस्तावांवर कार्यवाही करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाले आहेत. Classrooms at Waki ​​School to undergo repairs

Tags: Classrooms at Waki School to undergo repairsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.