• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
5 June 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विजय मसुरकर अभिष्टचिंतन सोहळा

by Mayuresh Patnakar
June 5, 2026
in Old News
65 0
0
127
SHARES
363
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बहुआयामी नेतृत्वाचा ग्रामस्थ करणार गौरव

गुहागर, ता. 05 :  मासू बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते व विविध पदांवर कार्यरत असलेले श्री. विजय सोनू मसुरकर यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा  साजरा करण्यात येणार आहे. दिनांक ०६ जून २०२६ रोजी सायंकाळी ०५ वाजता विजय मसुरकर यांच्या निवासस्थानी, गणेशवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने विविध सामाजिक, शैक्षणिक, सहकारी व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  Vijay Masurkar Abhishtachintan ceremony

श्री. विजय सोनू मसुरकर हे ग्रामविकास क्षेत्रात सातत्याने सक्रिय असून त्यांनी ग्रामविकास मंडळ मासू बुद्रुक ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. तसेच भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तालुका गुहागरचे अध्यक्ष म्हणून त्यांनी संघटनात्मक कामकाजात भरीव योगदान दिले आहे. सामाजिक व धार्मिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग असून श्री सालबाईदेवी जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मंदिर विकास व सांस्कृतिक जपणूक यामध्ये मोलाचे कार्य केले आहे. Vijay Masurkar Abhishtachintan ceremony

Vijay Masurkar Abhishtachintan ceremony

सहकार क्षेत्रात त्यांनी व्हा. चेअरमन म्हणून शीर विकास सोसायटी लि. शीर येथे जबाबदारी सांभाळली असून कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका गुहागरचे कार्यकारी सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. तसेच कुणबी नागरी सहकारी पतपेढी लि. आबलोली येथे संपर्क प्रमुख म्हणून ते सेवा देत आहेत. तसेच तंटामुक्ती समिती मासू व शाळा व्यवस्थापन समिती मासू नं. १ येथे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी सामाजिक शांतता व शैक्षणिक विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. Vijay Masurkar Abhishtachintan ceremony

केंद्र व राज्य सरकारच्या विविध प्रकारच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात त्यांचा हातखंडा आहे. प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ मासू गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवलेला आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनात माजी आमदार डॉक्टर विनयजी नातू यांच्या प्रयत्नातून व मार्गदर्शनाखाली विविध विकासकामे आणलेली आहेत. आता पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विविध विकास कामे करून घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यांना विकास कामांच्या दृष्टिकोनातून गावच्या पातळीवर माजी सरपंच श्री पांडुरंग नाचरे मंगेश मास्कर, महादेव नाचरे व मुंबई पातळीवर मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक मास्कर सरचिटणीस सुधाकर मास्कर अशोक नाचरे शंकर नाचरे त्यांचे उत्तम सहकार्य लागले आहे. Vijay Masurkar Abhishtachintan ceremony

ग्रामविकास, समाजसेवा व राजकीय क्षेत्रातील बहूआयामी विजय मसूरकर यांचा गौरव ग्रामस्थ करणार आहेत. 6 जूनला होणाऱ्या  सुवर्ण महोत्सवी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा  सर्वानी विजय मसूरकर यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन मासुवासियांनी केले आहे. Vijay Masurkar Abhishtachintan ceremony

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVijay Masurkar Abhishtachintan ceremonyटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share51SendTweet32
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.