नरिमन पॉईंट येथील २२ मजली इमारतीमध्ये जाणार सरकारी कार्यालये
मुंबई, ता. 03 : महाराष्ट्र सरकारने नरिमन पॉईंट येथील प्रसिद्ध एअर इंडिया इमारतीला आपल्या ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एअर इंडिया इमारतीसंदर्भात प्रक्रिया पूर्ण केली आहे. या ठिकाणी आता सर्व शासकिय कार्यालये हलविण्यात येणार आहेत. एकाच ठिकाणी सर्व कार्यालये जनतेसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कार्यालयांच्या भाड्याची बचत होणार आहे. Maharashtra Government Takes Control of Air India Building

२०२३ मध्ये राज्याच्या मंत्री मंडळाने मंत्रालयाच्या विस्तार आणि राज्य सरकारी कार्यालयाला हलविण्यासाठी नरिमन पॉईंट येथील एअर इंडिया इमारत खरेदी करण्याची योजनेला मंजूरी दिली होती. कॅबिनेटने एअर इंडिया असलेल्या ‘अन अर्न्ड इन्कम’ आणि इतर दंड माफ करण्याचा निर्णय घेतला कारण राज्य सरकार लवकरात लवकर या इमारतीचा कब्जा करु शकेल. राज्य सरकारने या इमारतीसाठी १६०१ कोटी रुपये दिले आहेत. या अधिग्रहणासोबत २२ मजली इमारतीमध्ये सरकारी कार्यालयासाठी ४६ हजार ४७०वर्ग मीटर जागा उपलब्ध होणार आहे. Maharashtra Government Takes Control of Air India Building