गुहागर, ता. 30 : तालुक्यातील अंजनवेल सडेवाडी येथे २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे अंजनवेल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार विजय सैतवडेकर (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे. ओंकार हा आपल्या राहत्या घरातील किचनच्या छताच्या भाल्याला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. Youth commits suicide by hanging

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व नातेवाईकांनी तत्काळ धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (आमृ. क्र. १९/२०२६) करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत. Youth commits suicide by hanging