गुहागर, ता. 28 : गतवर्षी पावसाच्या सुरुवातीला नगरपंचायत कार्यक्षेत्रातील डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर यावर्षी खड्डे भरून मलमपट्टी करण्यात आल्याने यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. परिणामी दर्जेदार कामांचा दाखला देणारे लोकप्रतिनिधीही अशा कामांमुळे हतबल झाले आहेत. Filling and patching potholes on roads

गतवर्षी पावसाळ्या अगोदर गुहागर कीर्तनवाडी ते जांगळेवाडी या मुख्य रस्त्याचे सुमारे २० लाख रुपये खर्च करून डांबरीकरण करण्यात आले. मात्र पावसाळ्यामध्ये हा रस्ता बऱ्याच ठिकाणी खचला होता. रस्त्याला समपातळी नसल्याने हे काम पुन्हा करावे असे नगरपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले होते. मात्र या रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम करून तात्पुरती मलमपट्टी करून देण्यात आली. तसेच यावर्षी केलेल्या एचपी गॅस गोडाऊन ते छत्रपती शिवाजी चौक रस्त्याचे २५० मीटरच्या रस्त्याची अशीच अवस्था आहे. या रस्त्यासाठी सात लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. कोणतेही निर्बंध न लावता रस्त्यावर टाकण्यात आलेले स्पीड ब्रेकर अडचणीचे ठरत आहेत. शहरातील नगरोत्थान मधून ३१ लाख खर्च करून उफराटा गणपती मंदिर ते कुलस्वामिनी चौक या ८०० मीटर रस्त्याचे काम सुरू आहे. गतवर्षी पावसाळ्या अगोदरं हा रस्ता न केल्याने त्याची मुदत वाढ देऊन यावर्षी या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. मात्र या रस्याचे कामही निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नगरपंचायतीच्या माध्यमातून होत आहे. यामुळे कामांचा दर्जा सध्या शोधावा लागत आहे. Filling and patching potholes on roads
याबाबत बांधकाम सभापती उमेश भोसले यांना विचारणा कली असता, त्यांनी रस्त्याच्या कामांचा दर्जा राखला जात नसल्याबाबत खेद व्यक्त केला. मात्र याबाबत येथील जनता काही बोलत नाही, लोकप्रतिनिधींना विचारणा केली असता त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद नाही. यामुळे आपणही हतबल असल्याचे सांगितले. नगरपंचायतीमध्ये सध्या होणाऱ्या कामांवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्ष सक्रीय नाही. त्यामुळे आता होणाऱ्या नवीन कामांच्या दर्जाबाबत शहरवासियांनाच जागृत रहावे लागणार आहे. Filling and patching potholes on roads
