उपविभागांचा कारभार आणखी गतिमान
गुहागर, ता. 27 : चिपळूण येथील पोस्ट कार्यालयाच्या वरील मजल्यावर जून महिन्यापासून विभागीय कार्यालय सुरू होणार आहे. त्यामुळे उपविभागांचा कारभार आणखी गतिमान होणार असून काही तालुक्यांमधील ग्राहकांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी रत्नागिरीत जाण्याचा ताप वाचणार आहे. सर्वत्र विविध बँका, पतसंस्था यांचा विस्तार वाढत असला तरी आजही ग्राहकांचा पोस्ट कार्यालयावरील विश्वास कायम असून ग्राहकांची संख्या कायम वाढताना दिसत आहे. Divisional post office to be set up in Chiplun

या कार्यालयाकडून आपल्या सुविधांचा तितकासा प्रचार आणि प्रसार होताना दिसत नसला तरीही ग्राहक त्याची माहिती घेण्यासाठी कार्यालयांमध्ये येताना दिसतात. शहरातील नगर परिषदेसमोर पोस्टाचे मुख्य कार्यालय आहे. येथे दर दिवशी हजारो ग्राहक येतात. त्यांना अनेक कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागण्याचा त्रास सहन करावा लागतो. यातून काही ग्राहक आपल्या विभागीय तक्रारी रत्नागिरील मुख्य कार्यालयापर्यंत पोहचवण्याचा विचार करतात. मात्र ते शक्य होत नाही. त्यातच तक्रार वहीही ग्राहकांना दिली जात नाही. त्यामुळे विभागीय कार्यालय सुरू झाल्यावर येथे डाकघर अधीक्षक व अन्य अधिकारी, कर्मचारी राहणार असल्याने ग्राहकांना तक्रारी करणे, विविध योजनांची माहिती घेणे सहज शक्य होणार आहे. तक्रारींचे आता तात्काळ निवारण कार्यालयीन बाबींचा विचार करता काही तांत्रिक अडचणी दूरध्वनीवरून रत्नागिरीतून सोडवून घेण्याऐवजी त्या आता येथूनच सुटणार आहेत. Divisional post office to be set up in Chiplun
त्यामुळे चिपळूणसह गुहागर, खेड, दापोली आदी तालुक्यातील पोस्ट कार्यालयांचा कारभार आणखी गतिमान होणार आहे. या विभागीय कार्यालयामुळे निर्णय क्षमता वाढणार असून ग्राहकांच्या सूचना, तक्रारींचे तात्काळ निवारण करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे या विभागीय कार्यालयाचा पोस्ट कार्यालयांसह ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. Divisional post office to be set up in Chiplun