• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 May 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

by Manoj Bavdhankar
May 27, 2026
in Maharashtra
99 1
0
Ratnagiri Police's Impressive Performance
194
SHARES
553
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विहित मुदतीत १००% दोषारोप पत्रे सादर करत नोंदवले उल्लेखनीय यश

गुहागर, ता. 27 : गुन्हेगारांना वेळेत चाप बसवण्यासाठी आणि पीडितांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. १ जानेवारी २०२६ ते १८ मे २०२६ या कालावधीत ज्या गुन्ह्यांची कायदेशीर मुदत पूर्ण झाली होती, अशा सर्वच्या सर्व (१००%) गुन्ह्यांमध्ये रत्नागिरी पोलिसांनी विहित वेळेत न्यायालयात दोषारोप पत्रे (चार्जशीट) सादर करून मोठी यशस्विता मिळवली आहे. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बागटे यांनी घेतलेल्या एका विशेष आढावा बैठकीत जिल्हा पोलीस दलाची ही चमकदार कामगिरी समोर आली आहे. Ratnagiri Police’s Impressive Performance

​पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आढाव्यामध्ये प्रामुख्याने दोन गटांतील गुन्ह्यांचा तपास आणि त्यांच्या दोषारोप पत्रांचा समावेश करण्यात आला होता.​ १० वर्षांपेक्षा कमी शिक्षेचे गुन्हे : या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यासाठी ६० दिवसांची मुदत असते. या कालावधीत एकूण ७८० गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यापैकी ३२७ गुन्ह्यांमध्ये वेळेत दोषारोप पत्रे सादर करण्यात आली आहेत. उर्वरित ३२४ गुन्हे अद्याप तपासाधीन असून, त्यांची ६० दिवसांची कायदेशीर मुदत अजून संपलेली नाही. ​ १० वर्षांपेक्षा अधिक शिक्षेचे गुन्हे: गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यांमध्ये ९० दिवसांच्या आत दोषारोप पत्र सादर करणे बंधनकारक असते. अशा एकूण ४८ गुन्ह्यांची नोंद झाली होती, ज्यापैकी २५ गुन्ह्यांची चार्जशीट न्यायालयात दाखल झाली आहे. उर्वरित २४ गुन्ह्यांचा तपास सुरू असून त्यांची ९० दिवसांची मुदत अद्याप शिल्लक आहे. Ratnagiri Police’s Impressive Performance

​​”रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अत्यंत काटेकोरपणे, वेळेत आणि आपापसात उत्तम समन्वय ठेवून हा तपास पूर्ण केला आहे. ज्या गुन्ह्यांची कायदेशीर मुदत पूर्ण झाली होती, त्या सर्व गुन्ह्यांमध्ये आम्ही १००% दोषारोप पत्रे दाखल करण्यात यशस्वी झालो आहोत. भविष्यातही गुन्हे तपासाची गुणवत्ता आणि पोलिसांची कार्यक्षमता आणखी वाढवण्यासाठी रत्नागिरी पोलीस कटिबद्ध आहेत.”- पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी

​पोलिसांच्या या अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी कामगिरीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला वेसण बसेल, यात शंका नाही. रत्नागिरी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. Ratnagiri Police’s Impressive Performance

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRatnagiri Police's Impressive Performanceटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share78SendTweet49
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.