• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 May 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिक्षक, कर्मचाऱ्यांना ‘आभा’ बंधनकारक

by Guhagar News
May 26, 2026
in Maharashtra
34 1
0
67
SHARES
192
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अन्यथा पाच लाखांपर्यंतची वैद्यकीय बिले नाकारली जाणार

गुहागर, ता. 26 : राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा तसेच १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ‘आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट’ अर्थात ‘आभा’ कार्ड काढणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. हे कार्ड न काढणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याचे पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक भविष्यात स्वीकारले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) दिला आहे. ABHA Mandatory for Teachers and Staff

शाळांमधील कर्मचाऱ्यांना ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’त हे कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र शिक्षण संचालक (अंदाज व नियोजन) डॉ. एकनाथ आंबोकर यांनी जारी केले असून, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना याचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. अनुदानित या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याकडे ‘आभा’ कार्ड असणे बंधनकारक आहे. शिक्षण संचालनालयाने पत्रकासोबत आभा कार्ड काढण्याची कार्यपद्धती आणि व्हिडिओ लिंक जोडली असून, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लवकर आपली कार्डे काढून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. ABHA Mandatory for Teachers and Staff

Tags: ABHA Mandatory for Teachers and StaffGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share27SendTweet17
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.