• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 May 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ निकाली काढा

by Mayuresh Patnakar
May 26, 2026
in Ratnagiri
30 0
0
58
SHARES
167
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण दीपक घाटे

रत्नागिरी, ता. 26 : महाडीबीटी पोर्टलवर जिल्ह्यातील विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज अद्यापही महाविद्यालय स्तरावर व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असल्यामुळे ते तात्काळ निकाली काढणे आवश्यक आहे.  या अनुषंगाने प्रलंबित अर्जाचा आढावा घेण्यासाठी संबंधित स्तरावर विशेष बैठकांचे आयोजन करण्यात येत असून, प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण दीपक घाटे यांनी केले आहे. Pending Scholarship Applications

महाडीबीटी पोर्टल व्हर्जन 2.0 अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन 2019-20 ते 2025-26 या कालावधीतील प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याच्या सूचना समाज कल्याण विभागाने दिल्या आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक लाभ वेळेत मिळावेत यासाठी ही कार्यवाही बंधनकारक करण्यात आली आहे. समाज कल्याण आयुक्तालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यभरात मोठ्या प्रमाणावर अर्ज संस्था व जिल्हास्तरावर प्रलंबित असल्याची बाब निदर्शनास आली आहे. केंद्र शासनामार्फत विद्यार्थ्यांच्या 60 टक्के केंद्र हिस्सा मंजुरीसाठी अर्ज स्वीकृतींची अंतिम मुदत 31 मे 2026 निश्चित करण्यात आली असून त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत डेटा स्वीकारला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. Pending Scholarship Applications

त्यामुळे संबंधित अधिकारी, संस्था व महाविद्यालयांनी प्रलंबित अर्जाची पडताळणी करून विहित मुदतीत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. अन्यथा पात्र विद्यार्थी केंद्र शासनाच्या लाभापासून वंचित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याचा इशाराही समाज कल्याण विभागाने दिला आहे. Pending Scholarship Applications

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPending Scholarship Applicationsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share23SendTweet15
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.