भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र, स्कॉन प्रो फाऊंडेशनतर्फे आवाहन
रत्नागिरी, ता. 23 : भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र (पुणे) आणि स्कॉन प्रो फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय देण्यात येणार आहेत. याकरिता रत्नागिरीत उद्या रविवारी दि २४ मे रोजी मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांनाही थेट शिबिरात सहभाग घेता येईल, त्यामुळे ज्या दिव्यांग व्यक्तींनी भाग घेतला नाही त्यांनी शिबिरात जरूर सहभागी व्हावे, असे आवाहन शिबिर समन्वयक ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे. Free foot measurement camp
आतापर्यंत १५० हून अधिक दिव्यांगानी शिबिरात नोंदणी केली आहे. अजूनही रत्नागिरी व नजीकच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच गोव्यातील दिव्यांगांनी नोंदणी केली नसल्यास त्यांनी थेट शिबिरात यावे असे आवाहन केले आहे. हे शिबीर उद्या दिनांक २४ मे रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० या वेळेत साळवी स्टॉप येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात होईल. याद्वारे गरजू दिव्यांगांना उच्च दर्जाचे आधुनिक ‘मॉड्यूलर’ कृत्रिम पाय मोफत दिले जाणार आहेत. यापूर्वी अशी शिबिरे चिपळूण, मार्गताम्हाणे येथे आयोजित केली होती. Free foot measurement camp

ऑटोफोल्ड अत्याधुनिक पाय
भारत विकास परिषद दिव्यांग केंद्राचे विश्वस्त विनय खटावकर, शिबिर समन्वयक ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, बाजारात या आधुनिक कृत्रिम पायांची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, मात्र स्कॉन प्रो. फाउंडेशनच्या सामाजिक निधीतून हे पाय पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत. हे पाय पारंपरिक जयपूर फूटपेक्षा अत्यंत वेगळे आणि प्रगत आहेत. वजनाने हलके आणि ‘ऑटोफोल्ड’ सुविधा असलेले हे पाय बसवल्यानंतर व्यक्ती केवळ चालूच शकते असे नव्हे तर धावणे, पोहणे, उडी मारणे, वाहन चालवणे आणि शेतीची कष्टाची कामेदेखील सहजपणे करू शकतात. Free foot measurement camp
नोंदणी किंवा अधिक माहितीसाठी श्री. कुलकर्णी (९३७१०८८९११) किंवा श्री. संजीव (७०२८०४५९५५) यांच्याशी संपर्क साधावा. शिबिरात येणाऱ्या दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहायकांसाठी मोफत भोजन, चहाची व्यवस्था स्कॉन प्रो. फाउंडेशन यांच्यातर्फे करण्यात आली आहे. Free foot measurement camp