• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 May 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पुन्हा ३८ वर्षांनी दुमदुमणार शाळेची घंटा

by Mayuresh Patnakar
May 22, 2026
in Guhagar
68 0
0
Student get-together at Palshet
133
SHARES
380
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पालशेत येथील पालशेतकर विद्यालयाच्या १९८८ च्या विद्यार्थ्यांचे ५ वे स्नेहसंमेलन

गुहागर, ता. 22 : श्रीमती आर. पी. पालशेतकर विद्यालय, पालशेत येथील एस.एस.सी. मार्च १९८८ बॅचच्या विद्यार्थ्यांचे ५ वे स्नेहसंमेलन रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ८.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत विद्यालय परिसरात हा भावनिक आणि प्रेरणादायी मेळावा पार पडणार आहे. Student get-together at Palshet

Student get-together at Palshet

३८ वर्षांनंतर शाळेची घंटा पुन्हा वाजणार, “सरत्या वयाच्या सांजवेळी जीवनाचा अर्थ शोधताना” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहसंमेलनात जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या बॅचमधील विद्यार्थी आज अभियांत्रिकी, विधी, बँकिंग, शिक्षण, प्राध्यापक, शिक्षक, शेती तसेच उद्योग व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असून समाजात आपापले वेगळे स्थान निर्माण केले आहे. Student get-together at Palshet

या बॅचची यापूर्वी १९९५, १९९७, २०११ आणि २०२२ मध्ये अशी चार स्नेहसंमेलने यशस्वीरीत्या पार पडली आहेत. २०२६ मधील हे ५ वे स्नेहसंमेलन विशेष उत्साहात आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शालेय ऋणाची जाणीव ठेवत या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सन २०१५ मध्ये विद्यालयाच्या भौतिक गरजांसाठी पुढाकार घेत संपूर्ण शाळेच्या इमारतीस सुमारे रु. ३ लाख खर्च करून रंगकाम करून दिले होते. त्यामुळे या बॅचबद्दल परिसरात विशेष गौरव व्यक्त केला जात आहे. Student get-together at Palshet

स्नेहसंमेलनात प्रार्थना, जुने मित्र-मैत्रिणींचा सन्मान, आठवणींना उजाळा, मैत्री भोजन, गप्पा-गोष्टी तसेच भावनिक अनुभवांची देवाणघेवाण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमास एस एस सी मार्च १९८८ चे सर्व माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. Student get-together at Palshet

Student get-together at Palshet

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarStudent get-together at Palshetटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share53SendTweet33
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.