• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 May 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळुणात विभा अरविंद ग्रंथालयाचे उद्घाटन

by Manoj Bavdhankar
May 20, 2026
in Ratnagiri
26 0
0
Library Inauguration in Chiplun
50
SHARES
144
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने उभारलेल्या विभा अरविंद ग्रंथालयचे उद्घाटन रविवार दिनांक २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शहरात खेंड येथील स्प्रिंग क्लिनिकच्या तळमजल्यावर, जेड गार्डन, स्वरविहार, गणपती मंदिराशेजारी पार पडणार आहे. Library Inauguration in Chiplun

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीभूषण तानाजीराव चोरगे हे राहणार असून नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून लोकप्रिय आमदार शेखर निकम उपस्थित राहणार आहेत. तसेच ‘आपलं चिपळूण’चे कार्याध्यक्ष संतोष देशमुख, लोटिस्माचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, घरडा उद्योग समूहाचे आर. सी. कुलकर्णी, वक्ते व प्रवचनकार धनंजय चितळे, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, चिपळूणचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत हेही उपस्थित राहणार आहेत. Library Inauguration in Chiplun

विभा अरविंद ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नामांकित लेखकांच्या पुस्तकांचे दालन चिपळूणमध्ये उपलब्ध होणार आहे. वाचनप्रेमींसाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. विशेषतः वृद्ध, महिला, तरुण आणि युवकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने अध्यक्ष प्रकाश काणे, कार्यवाह विजय कदम , कोषाध्यक्ष विनायक ओक आणि मार्गदर्शक श्री प्रकाश देशपांडे यांनी केले आहे. Library Inauguration in Chiplun

Library Inauguration in Chiplun

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLibrary Inauguration in ChiplunMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share20SendTweet13
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.