विश्वासात घेण्यावरून शिवसेनेने सुनावले
गुहागर, ता. 11 : शहरातील गटर सर्वेक्षणाबाबतचे विषयावर अजंठा काढताना अगोदरच हरकत घेणे आवश्यक होते. तर एखादा विषय घेताना आपण नगरपंचायतीवर युती म्हणून काम करत असून जर युतीबद्दल बोलत असाल तर सर्वांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. असे मत शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अमरदीप परचुरे यांनी व्यक्त करत यासारख्या विविध विषयांवर शिवसेना नगरसेवकांनी आपल्या सहकारी पक्षातील पदाधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. Alliances face off in N.P. meeting
गुहागर नगरपंचायतीची जनरल सभा नगराध्यक्ष सौ. नीता मालप यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेतून प्रथमच शहरातील गटर व्यवस्थेबाबत सर्वेक्षण निविदा काढण्याचा विषय ठेवण्यात आला. मात्र गटर कामाबाबत असा उल्लेख असल्याने जर निर्णय घेण्यात आला आहे. तर आमची मंजुरी कशासाठी असे मत उपस्थित नगरसेवकांनी या वेळेला व्यक्त केले ज्या वेळेला अजंठा काढला गेला त्यावेळेला अशा शब्दावर का आक्षेप घेतला नाही. प्रशासनाने नगराध्यक्षना आवश्यक माहिती का दिली नाही. असे सवाल नगरसेवकांनी व्यक्त करत आपण नगरपंचायतीमध्ये युती म्हणून एकत्र काम करत आहोत यामुळे सर्वांना विश्वासात घेणे प्रमुखाचे काम आहे. असे मत नगरसेवक अमरदीप परचुरे यांनी व्यक्त केले. शहरात गटर काढणेसाठी आराखडा तयार करण्याअगोदर सर्वांना विश्वासात घ्यावे असेही मत व्यक्त करण्यात आले.
सफाई कर्मचाऱ्यांची मुदत ऑगस्टमध्ये संपण्याअगोदर निविदा प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना नगराध्यक्ष सौ. मालप यांनी दिली. कचरा संकलनासाठी लावलेले क्यू आर कोड केवळ शोभेचेच आहेत का. कोणाकडून कचरा संकलित होतो कोण कचरा देत नाही याची माहिती या क्यू आर कोड द्वारे मिळू शकते. मग त्याचा वापर का करत नाही. असा सवाल नगरसेवक अमरदीप परचरे यांनी केला. नगरपंचायत फंड बाबत कोणालाच माहिती दिली जात नाही खर्च करताना तो सर्वांना सांगण्यात यावा. 2025 सालापासून केलेला खर्चाचा रेकॉर्ड नाही. यामुळे यापुढे नगरपंचायत फंड खर्च करताना सर्व नगरसेवकांना विश्वासात घ्यावे, असे मत सर्वांच्या वतीने व्यक्त करण्यात आले. आयत्या वेळच्या विषयामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण शहरातील वाहतूक कोंडीवर सम विषम नियम लागू करावा, अशी सूचना केली होती. हा विषय अजंठावर का घेतला नाही. आज वैकुंठ भूमीमध्ये लाकडाचा पुरवठा केला जात नाही, कर्मचाऱ्यांना अंत्यसंस्कारावेळी गिरणीवरून लाकडे आणावे लागतात, हे असं का होतं, यापुढे असं होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. आदी विषयांवर नगरसेवक अमरदीप परसुरे यांनी नगराध्यक्षांचे विशेष लक्ष वेधून घेतले. गुहागर समुद्र किनाऱ्यावर जीव रक्षक म्हणून नेमणूक करताना संबंधित कर्मचाऱ्याला ट्रेनिंग असणे महत्त्वाचे आहे. जर त्याला जीव वाचवण्याचे ज्ञानच माहीत नसेल तर त्याची नेमणूक नक्की कशासाठी. असा सवालही या सभेतून नगरसेवकांनी केला. Alliances face off in N.P. meeting
करवाढ निर्णय अनिर्णित
गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील करवाडीबाबत 50 टक्के कर वाढवणे गरजेचे असून कर आकारणी कशी व्हावी याबाबतचा विषय घेण्यात आला होता मात्र जर प्रशासनाने 2024 ला करवाढीचा ठराव घेतला होता तर पुन्हा हा विषय आजच्या सभेमध्ये का घेतला असं म्हणून यावेळी मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने हा विषय अनिर्णित ठेवण्यात आला. Alliances face off in N.P. meeting
प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटताना सर्वांना विश्वासात घ्यावे
या सभेतून शिवसेना नगरसेवकांनी भाजप गटनेत्यांना युतीची आठवण करून दिली. विकास आराखडा या महत्त्वाच्या विषयावर जर प्रशासकीय कार्यालयात कोणा वरिष्ठांना भेटायला जायचे होते. तर युती म्हणून सर्व नगरसेवकांना माहिती देणे गरजेचे होते. जर सर्वसामान्य ग्रामस्थ या भेटीसाठी जाऊ शकतात तर भाजपा बरोबर शिवसेनेचे नगरसेवक का नाहीत असा सवालही उठतो. शेवटच्या क्षणी तुम्ही येताय का असं म्हणून बोलावणं म्हणजे आलात तर ठीक आहे. नाही आलात तर काही अडचण नाही असा समज होतो. यामुळे युती म्हणून काम करत असताना सर्व नगरसेवकांना माहिती दिलीच पाहिजे असे मत नगरसेवक अमरदीप परचुरे यांनी या वेळेला व्यक्त केले.
या सभेला उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, गटनेते उमेश भोसले, गटनेते अमोल गोयथळे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. Alliances face off in N.P. meeting
