तहसीलदार परिक्षित पाटील, शासनाच्या 20 सेवांचा समावेश
गुहागर, ता. 8 : Maharajswa Abhiyan शासन निर्णयाची जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी या शिबिरांचे आयोजन केलेले आहे. या शिबिरात कायद्याने अभिप्रत असलेल्याच गोष्टी होतील. असे प्रतिपादन गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले. ते शुक्रवारी (ता 8) भंडारी भवन येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत् होते. Maharajswa Abhiyan in Guhagar
सध्या सर्वत्र महाराष्ट्र शासन यांचेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान सुरू आहे. याच अभियानाचा भाग म्हणून तहसीलदार कार्यालय गुहागर अंतर्गत गुहागर महसूल मंडळातील सर्व ग्रामस्थ, खातेदार यांच्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर कै इंदिरा वासुदेव शेटे सभागृह, भंडारी भवन या ठिकाणी शुक्रवारी (ता. 8 मे) संपन्न झाले. Maharajswa Abhiyan in Guhagar

या शिबिरामध्ये वर्ग 2 असलेल्या जमिनींचे वर्ग 1 मध्ये रूपांतरण मार्गदर्शन व 7/12 वाटप., जिवंत 7/12 मोहिमे अंतर्गत मयत व्यक्तींचे वारस तपास करणे, सामाजिक अर्थ सहाय्य योजनांचे लाभ देणे, तुकडे बंदी, सर्व शालेय विद्यार्थी यांना उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअर दाखले, वय, राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्र वाटप, 7/12 मधील चुका संदर्भात दुरुस्ती अर्ज स्वीकारणे, अकृषिक तरतुदी संदर्भातील सुधारणांबाबत मार्गदर्शन, भूसंपादन तसेच कृषी प्रकरणामधील कमी-जास्त पत्रके कार्यवाही, प्रलंबित असलेले फेरफार मंजूर करणे तसेच डिजिटल 7/12, 8 अ, फेरफार वाटप, धान्य पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिकेत नावे समाविष्ट करणे किंवा कमी करणे. एक खीडकी व्यवस्थापन तसेच महसूल व्यतिरिक्त सेवांमध्ये आधार नोंदणी, आधार नोंदणी अद्यावत करणे, ॲग्रीस्टॅक, पीएम किसान नोंदणी करणे, आरोग्य विषयक सेवा, पोस्ट आणि एसटी महामंडळाच्या विविध सेवा देण्यात आल्या. Maharajswa Abhiyan in Guhagar
या शिबिराला गुहागर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल नगरसेवक अमरदीप परचुरे, समीर बागकर, सुजित साटले, मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, असगोलीच्या सरपंच नाटेकर नायब तहसीलदार स्नेहल मेहता, मंडळ अधिकारी प्रीती रेवाळे, पुरवठा शाखेच्या स्मृती पेंडसे, ग्राम महसूल अधिकारी सुशील परिहार आदी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी निलेश पाटील यांनी केले. Maharajswa Abhiyan in Guhagar
