सभापती प्रणव पोळेकर
गुहागर, ता. 28 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे कार्य सर्वच क्षेत्रात असून उल्लेखनीय आहे. गेल्या अनेक वर्ष मी बघत आहे. जिल्ह्यातील अपंगांसाठी सर्वोतोपरीने मदत करणार असल्याचे प्रतिपादन गुहागर पंचायत समिती चे सभापती प्रणव पोळेकर यांनी केले. गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा 24 वा वर्धापन दिन संस्थेचे कार्यालय वरवेली येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. Anniversary of the Disabled Rehabilitation Institute
या वेळी संस्थेतर्फे दिव्यांग साथी पुरस्कार पत्रकार सत्यवान प्रभाकर घाडे तसेच दिव्यांग मित्र पुरस्कार विनायक तुकाराम जाधव सहाय्यक शिक्षक श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर यांना देण्यात आला. तसेच दिव्यांग त्याचप्रमाणे विधुर व विधवा, घटस्फोटीत व्यक्तींसाठी वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तर दिव्यांगात्वावर मात करून स्वतःचा व कुटुंबाचा उदार निर्वाह करणाऱ्या असे अनंत पालकर पालपिणे यांना स्वयंसिद्ध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. Anniversary of the Disabled Rehabilitation Institute

याच कार्यक्रमांमध्ये संस्थेला निधी संकलन उपक्रमात उल्लेखनीय निधी गोळा करुन दिल्याबद्दल विद्यार्थी शाळा व केंद्र प्रमुख यांचाही सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांच्यामार्फत नासा व इस्रो भेटीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हा परिषद शाळातील पाच विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानचिन्ह भेटवस्तू देऊन करण्यात आला. गरजू दिव्यांगाना कुबड्या, व्हीलचेअर , कमरेचे पट्टे, मानेचे पट्टे, गुडघ्याचे पट्टे ,वॉकिंग स्टिक ( काठी ) इत्यादी कृत्रिम साहित्याचे वाटप करण्यात आले. Anniversary of the Disabled Rehabilitation Institute

या कार्यक्रमासाठी गुहागर पंचायत समितीचे सभापती .प्रणवजी पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे ,माजी सभापती व नगराध्यक्ष मा. राजेश बेंडल , उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल , मुकुंद कानडे चिपळूण, मधुसूदन केतकर चिपळूण, वरवेली गावचे सरपंच .नारायण आग्रे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सौ शिरभाते मॅडम जिल्हा परिषद रत्नागिरी,संस्थेचे जेष्ठ सल्लागार विनायक ओक , प्रकाश बापट, किरण शिंदे, रवींद्र कुळये , महेंद्र देवळेकर, श्रीकांत वेल्हाळ, डी पी गुरव , सर्पमित्र व सल्लागार ज्ञानेश्वर म्हात्रे, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे , पालशेत हायस्कूलचे मुख्याध्यापक बोलभाट, पाापन्हाळे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ चव्हाण मॅडम, काजुर्ली हायस्कूलचे मुख्याध्यापक घाग सर, लिटिल चॅम्प्स इंग्लिश मिडीयम चे मुख्याध्यापक मा.श्री शिरकर सर, , उमेश खैर, गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, पत्रकार गणेश धनावडे, गणेश किर्वे, ग्रामसेवक भुवड जिल्हा परिषद रत्नागिरीचे समाजकारण विभागाचे रसाळ,संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग उपाध्यक्ष प्रकाश अनगुडे सरचिटणीस सुनील रांजणे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गोयथळे वं रुपेश सौंदेकर सर यांनी केले. तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रकाश अनगुडे सर यांनी मानले. Anniversary of the Disabled Rehabilitation Institute
