• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 April 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अभियंत्याची २६ लाखाची ऑनलाईन फसवणूक

by Guhagar News
April 28, 2026
in Guhagar
66 1
1
Online Fraud
130
SHARES
371
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर पोलीस ठाण्यात दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील एका पूल प्रकल्पावर काम करणारे अभियंता विनयकुमार सिन्हा (वय ४८) यांची तब्बल २६ लाख ७६ हजार ९४१ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. फेसबुकवरून मैत्री करून त्यातूनच गुंतवणुकीचा सल्ला देत २६ मार्च ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ही फसवणूक झाली आहे. याप्रकरणी आदिती शर्मा व अंकित शर्मा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Online Fraud

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनयकुमार सिन्हा हे अभियंता असून सध्या ते गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामामध्ये अशोका बिल्टकॉन लिमिटेड कंपनीमध्ये काम करत आहेत. सिन्हा यांना फेसबुकवरून आदिती शर्मा नावाच्या मुलीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री जुळवली. त्यानंतर तिने डिजिटल समाजमाध्यमांवर बोलत असताना सिन्हा यांचा विश्वास संपादन केला. यातंच आदिती शर्माने त्यांना इटीएच इथेरियम प्लॅटफॉर्म’मध्ये ‘युएसडीटी क्रिप्टो करन्सी द्वारे करण्याचा सल्ला देत ‘सीनचैन प्लॅटफॉर्म लिंक’ व ‘बायनान्स अॅप’ यामध्ये खाते तयार केले. त्यानंतर तिचा साथीदार ब्रोकर अंकित शर्मा याचा मोबाईल क्रमांक देऊन त्याने गुंतवणूक ट्रेडींग सल्लागार असल्याचे सिन्हा यांना सांगितले. Online Fraud

या दोघांनीही ‘युएसडीटी क्रिप्टो करन्सी द्वारे गुंतवणूक करण्यास भाग पाडून फिर्यादी यांच्याकडून २६ मार्च ते १६ एप्रिल २०२६ या मुदतीत २६ लाख ७६ हजार ९४१ रुपये इतकी गुंतवणूक करून घेतली. परंतु ते पैसे मुदत संपल्यावर काढण्याचा वारंवार प्रयत्न केला असता सिन्हा यांना पैसे परत मिळालेले नाहीत. तसेच आदिती शर्मा व अंकित शर्मा यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये शनिवारी रात्री आरोपी आदिती शर्मा व अंकित शर्मा यांच्यावरे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Online Fraud

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarOnline fraudटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share52SendTweet33
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.