रत्नागिरी, ता. 28 : कोकणात (Konkan) जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रचंड गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावर अतिरिक्त मेमू ट्रेन (MEMU Train) चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ मे ते ७ जून या कालावधीत ही विशेष सेवा उपलब्ध असेल. प्रामुख्याने शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही अनारक्षित रेल्वे गाडी सुरू करण्यात येत आहे, ज्यामुळे चाकरमान्यांना मोठा फायदा होणार आहे. ‘Diva–Chiplun’ MEMU Train to Start
वेळापत्रक आणि प्रवासाचे दिवस
ही विशेष मेमू ट्रेन (Memu Train) आठवड्यातून तीन दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण ते दिवा (गाडी क्रमांक ०११६०) ही रेल्वे दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि रात्री ११.१० वाजता दिवा जंक्शनला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दिवा ते चिपळूण (गाडी क्रमांक ०११५९) ही रेल्वे रात्री ११.२५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता चिपळूणला पोहोचेल. या महिनाभराच्या कालावधीत दोन्ही बाजूंकडून एकूण ३६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ‘Diva–Chiplun’ MEMU Train to Start
थांबे आणि प्रवासी सुविधा
आठ डब्यांची ही मेमू लोकल २३ रेल्वे स्थानकांचा (Railway Stations) या स्थानकांवर थांबणार आहे. दिवा-चिपळूण विशेष मेमू ट्रेन अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आप्टा, सोमटणे, पनवेल, कळंबोली, तळोजा पांचनंद आणि निळजे या रेल्वे स्थानकांवर थांबेल. तसेच कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांना असणारी प्रचंड प्रतीक्षा यादी पाहता, ही अनारक्षित मेमू सेवा प्रवाशांसाठी एक उत्तम पर्याय ठरेल. मात्र, डब्यांची संख्या केवळ आठ असल्याने प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार ही सोय पुरेशी ठरेल का, असा प्रश्नही काही प्रवाशांकडून विचारला जात आहे. ‘Diva–Chiplun’ MEMU Train to Start
