• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 April 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नागरिकांच्या सूचना व हरकतींचा विचार करणार

by Mayuresh Patnakar
April 25, 2026
in Guhagar
16 0
0
Guhagar Development Plan

Guhagar Development Plan

31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोकण विभाग सहसंचालक देशमुख यांची गुहागरवासीयांना ग्वाही

गुहागर, ता. 25 : Guhagar Development Plan गुहागर शहरातील नागरिकांच्या सूचना व हरकती यांच्या पूर्णपणे विचार होईल. मी स्वत: गुहागरात येऊन शहराची पाहणी करेन. अशी ग्वाही कोकण विभाग सह संचालक श्रीकांत देशमुख यांनी गुहागरवासीयांच्या शिष्ट मंडळाला दिली आहे. गुहागरच्या शिष्ट मंडळाला विषय मांडण्यासाठी कोकण भवन येथे अर्धा तासाची भेट मिळाली होती. मात्र सहसंचालकांना विषयाचे गांभिर्य लक्षात आले आणि दिड तास त्यांनी शिष्ट मंडळासोबत चर्चा केली. Guhagar Development Plan

गुहागर Guhagar Development Plan गेली 3 वर्ष चर्चेच्या भोवऱ्यात सापडला आहे; विकास आराखडा तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी गुहागरमधील पुर्वांपार वसलेली लोकांची घरे, विकासाला अडथळा ठरणारी सीआरझेडची मर्यादा या सगळ्याचा अभ्यास केला. परंतू त्यानंतरही व्यवहार्य विकास आराखडा बनविण्यात नगर रचनाकार विभागाला अपयश आले. त्यामुळे या विभागाने तयार केलेल्या शहर विकास आराखड्यावर दोन वर्षांपूर्वी हरकतींचा पाऊस पडला होता. त्यावेळी हरकती व सूचनांसाठी नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांनी विकास आराखड्यात (Guhagar Development Plan) अनेक बदल सुचविले मात्र अंतिम आराखड्यात मोजकेच बदल झाले.

महिनाभरापूर्वी 6 क्षेत्रांचा बदललेला Guhagar Development Plan विकास आराखडा पुन्हा प्रसिध्द झाला. त्यावरही हरकती सुचना देण्यात आल्या. मात्र यावेळी नगरपंचायतीत सत्तेत असलेल्या भाजप शिवसेना युतीने विशेष सर्वसाधारण सभेत या विकास आराखड्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे भाजपाचे गटनेते तथा बांधकाम सभापती उमेश भोसले, स्वीकृत  नगरसेवक संतोष सांगळे, विकास आराखड्याचे अभ्यासक अद्वैत जोशी व प्रथमेश दामले आणि गुहागर नगरपंचायतीमधील नगर रचनाकार प्रणव वेद्रे यांच्या शिष्ट मंडळाने  नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाचे कोकण सहसंचालक श्रीकांतजी देशमुख यांची भेट घेतली. ही भेट केवळ अर्धा तासाची होती. मात्र शिष्ट मंडळाने गुहागरवासीयांचे मुद्दे इतक्या प्रभावीपणे मांडले की पुढील दिड तास कोकण भवनात सहसंचालक देशमुख यांनी गुहागरवासियांच्या हरकती आणि सुचनांसंदर्भात विस्तृत चर्चा केली. गुहागर नगरपंचायतीने विकास आराखड्यामधील (Guhagar Development Plan) अन्यायकारक तरतुदी तसेच मागील हरकतींवर विचार विनिमय करण्याबाबत विशेष सभेच्या ठराव केला आहे. या ठरावाचे निवेदन सहसंचालक श्रीकांत देशमुख यांना देण्यात आले.  Guhagar Development Plan

या चर्चेमध्ये शिष्ट मंडळाने गुहागर शहराची भौगोलिक रचना,  त्यामधील 18 मिटर, 9 मिटरचे रस्ते, 30 मिटरचा महामार्ग तसेच शहरातील अनेक भागात नैसर्गिक क्षेत्र असतानाही नव्याने संरक्षित केलेले हरित क्षेत्र या गोष्टी शहराच्या विकासाला आणि मानवी वस्तीला हानिकारक असल्याचे उपस्थितांनी सांगितले. इतकेच नव्हेतर शिष्ट मंडळाने शहरांतर्गत वाहतुकीसाठी उपलब्ध असलेले पर्यायी मार्ग दाखवून दिले. स्थानिकांच्या मालकीच्या जागांवर आरक्षण टाकण्याऐवजी शासनाच्या,  नगरपंचायतीच्या मालकीच्या जागा आरक्षणासाठी कशा उपलब्ध आहेत याची माहिती दिली. ब्लू फ्लॅग बीच, कासव संवर्धन आणि गुहागरचे निसर्ग सौंदर्य यामुळे वाढणाऱ्या पर्यटनाला आवश्यक वाहनतळ, शहरवासीयांची सुरक्षा याबाबतही सविस्तर चर्चा झाली. Guhagar Development Plan

या चर्चेचा समोरोप करताना सहसंचालक श्रीकांत देशमुख म्हणाले की, नागरिकांनी केलेल्या सूचना व हरकतींचा पूर्णपर्ण विचार केला जाईल. मी स्वत: गुहागर शहराला प्रत्यक्षपणे भेट देऊन शहराची पाहणी करेन. त्यानंतर विकास आराखड्याला अंतिम रुप दिले जाईल. त्यांनी दिलेल्या या आश्र्वासनामुळे शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले आहे.

या संदर्भात गुहागर न्यूजशी बोलताना नगरसेवक संतोष सांगळे म्हणाले की, सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱी सामान्य नागरिकांचे म्हणणे इतका वेळ ऐकून घेतील याची कल्पनाच केली नव्हती. मात्र श्रीकांत देशमुख साहेबांनी आमचे सर्व मुद्दे केवळ ऐकून घेतले नाहीत तर समजून घेतले. आम्ही गुहागरवासीयांच्या वेदना त्यांच्यापर्यंत पोचविण्यात यशस्वी झालो आहोत.

Tags: GuhagarGuhagar Development PlanGuhagar NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.