• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 April 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पत्नीला सासरी नेऊन मारहाण

by Guhagar News
April 23, 2026
in Guhagar
96 0
0
Husband beat his wife
188
SHARES
536
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिपळूणमध्ये पतीवर गुन्हा दाखल

गुहागर, ता. 23 : बोलण्याच्या बहाण्याने पत्नीला माहेरातून घरी (सासरी) नेऊन तिच्यावर अमानुष मारहाण केल्याची घटना चिपळूणमधील काविळवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी पतीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. Husband beat his wife

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी निशात अजमल कडवडकर (वय ३३, रा. उकाडे, चिपळूण) या काही कारणास्तव सध्या आपल्या माहेरी राहत होत्या. सोमवारी रात्री सुमारे ९ वाजता आरोपी पती अजमल असलम कडवडकर हा उकाडे येथील त्यांच्या माहेरी गेला. “मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे,” असे सांगून त्याने निशात यांना विश्वासात घेतले आणि काविळवाडी येथील ‘कोयना बिल्डिंग’मधील आपल्या घरी नेले. Husband beat his wife

दोघे घरी पोहोचल्यावर काही कारणावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर लवकरच भांडणात झाले. रागाच्या भरात अजमलने पत्नीला हाताच्या थपडा मारत मारहाण केली व अश्लील शिवीगाळ केली. दरम्यान पीडित महिला घराबाहेर पडत असताना आरोपीने त्यांना जबरदस्तीने ओढून आणले. आणि त्यांच्या गालांवर आणि उजव्या हातावर चावा घेतला. या झटापटीत निशात यांच्या डाव्या डोळ्याखालीही दुखापत झाली. Husband beat his wife

या घटनेनंतर जखमी निशात कडवडकर यांनी तत्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपी पती अजमल कडवडकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. Husband beat his wife

Tags: GuhagarGuhagar NewsHusband beat his wifeLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share75SendTweet47
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.